Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2026 | 08:45 AM
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत विजांसह पाऊस होणार

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत विजांसह पाऊस होणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांवर पाणी जमा होत आहे.

हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ईशान्य मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागांवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे २२ ऑगस्ट रोजी पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत द्वीपकल्पीय भारतावर पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

रविवारी हवामान कसे असेल?

रविवार (दि.२३) दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहील. सकाळ ते दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी हलका ते अगदी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, रविवारी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य राहील, तर अनेक भागांमध्ये कमाल तापमानही सामान्य राहील. काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी असू शकते.

अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने पश्चिम हिमालयीन प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Web Title: Torrential rain wreaks havoc in the capital delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
2

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
3

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
4

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.