Delhi Assembly Elections: आप- काँग्रेसबरोबर शिवसेनेचे वाजले? उद्धव ठाकरेंच्या प्रचाराला न जाण्याचे कारण काय?
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक आगी जवळ येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. कॉँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होत आहेह. दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. प्रचाराच्या तोफा जोरदारपणे धडधडत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये फुट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हे देखील आता दिल्लीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीयेत. नेमके प्रकरण काय आहे ते जाऊन घेऊयात.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केल्याचे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष हे इंडिया आघाडीचे सदस्य होते. मात्र देशपातळीवर कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि कॉँग्रेसमध्ये एकी दिसून येत नाहीये.
उद्धव ठाकरे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आप आणि कॉँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार होते. मात्र आता उद्धव ठाकरे हे प्रचारात सहभागी होणार नाहीयेत. याबाबत खसदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले. आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस हे इंडिया आघाडीचे सदस्य आणि उद्धव बाळसाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मीतर आहेत. दरम्यान दिल्लीत कॉँग्रेस आणि आप स्वतंत्रपणे लढत असल्याने ठाकरे प्रचाराला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. कारण हे सगळे इंडिया आघाडीमधील एकत्रित पक्ष आहेत.
हेही वाचा: Delhi Assembly Elections: “… हे आता जनतेने ठरवायचे आहे”; अरविंद केजरीवालांची दिल्लीकरांना भावनिक साद
फलोदी सट्टा बाजारचा नवीन अंदाज काय?
राजस्थानमधील फलोदी सट्टा बाजार हे आपल्या अचूक अंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय समीकरणे आणि निवडणुकीचे परिणाम याबाबत भविष्यवाणी फलोदी सट्टा बाजार करत असते. हे केवळ अंदाज असतात. हे अंदाज खरे ठरतात की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नवीन अंदाजानुसार, आम आदमी पक्षाला नुकसान होताना पाहायला मिळत आहे. तर भाजप या निवडणुकीवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहे. नवीन अंदाजानुसार आम आदमी पक्षाला 2 जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
भाजपला फायदा?
भाजप या निवडणुकीत 31 ते 33 जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र भाजप बहुमताचा आकडा पार करेल असे वाटत नाही. सध्या सुरू असलेला प्रचार आणि इतर गोष्टी यांमुळे भाजपला 2 जागांवर बढत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिल्लीची सत्ता कोण काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेसदेखील ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. मात्र मुख्य लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होताना दिसून येत आहे.