अरविंद केजरीवाल यांची भाजपवर टीका (फोटो- नवभारत/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. प्रचाराच्या तोफा जोरदारपणे धडधडत आहेत. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढत आहेत. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “दिल्लीच्या नागरिकांकडे दोन मॉडेल आहेत. पहिले आहे केजरीवाल मॉडेल ज्यात, जनतेवर पैसे खर्च होतो. तसेच दुसरे आहे ते भाजपचे ज्यात जनतेचा पैसे त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या खिशात जातो. आता कोणते मॉडेल निवडायचे हे जनतेने ठरवायचे आहे.”
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, “ही निवडणूक केवळ दिल्लीला नाही तर देशाला वाचवण्याची निवडणूक आहे. भाजप आणि आम आदमी पक्षातील निवडणूक नाही तर, ही निवडणूक दोन विचारसरणीमधील निवडणूक आहे. राज्याचा आणि सरकारचा पैसा कुठे खर्च करायचा हे जनतेने ठरवायचे आहे. देशातील 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी त्या कोणत्याच राज्यात 24 तास वीजपुरवठा केला जात नाही. निवडणुकीत तुम्ही चुकीचे बटण दाबले, तर दिल्लीत पुन्हा 6 तास वीजपुरवठा खंडित केला जाईल. तुम्ही कमळाचे बटण दाबले की तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वीजपुरवठा खंडित होईल. ”
दिल्ली की जनता के पास दो मॉडल हैं: पहला है केजरीवाल मॉडल – जहाँ जनता का पैसा जनता पर खर्च होता है… और दूसरा है बीजेपी मॉडल – जहाँ जनता का पैसा उनके अमीर दोस्तों की जेब में जाता है। अब जनता को तय करना है, उसे कौन सा मॉडल चुनना है। https://t.co/I4IM0XXAKu
— AAP (@AamAadmiParty) January 26, 2025
Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता?
फलोदी सट्टा बाजारने बदलले दर
राजस्थानमधील फलोदी सट्टा बाजार हे आपल्या अचूक अंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय समीकरणे आणि निवडणुकीचे परिणाम याबाबत भविष्यवाणी फलोदी सट्टा बाजार करत असते. हे केवळ अंदाज असतात. हे अंदाज खरे ठरतात की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नवीन अंदाजानुसार, आम आदमी पक्षाला नुकसान होताना पाहायला मिळत आहे. तर भाजप या निवडणुकीवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहे. नवीन अंदाजानुसार आम आदमी पक्षाला 2 जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
भाजपला फायदा?
भाजप या निवडणुकीत 31 ते 33 जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र भाजप बहुमताचा आकडा पार करेल असे वाटत नाही. सध्या सुरू असलेला प्रचार आणि इतर गोष्टी यांमुळे भाजपला 2 जागांवर बढत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिल्लीची सत्ता कोण काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेसदेखील ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. मात्र मुख्य लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होताना दिसून येत आहे.