नवी दिल्ली – लखीमपूर येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. एक सातवी आणि दुसरी दहावीची विद्यार्थिनी होती. काही मुलांनी मुलींचे दुचाकीवरून अपहरण केले, बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप आईने केला आहे.
पोलिस तपासासाठी आले असता त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एसपी संजीव सुमन त्यांच्या समजूतीसाठी गेले, मात्र त्यांच्याशीही गावकऱ्यांनी बाचाबाची केली. परिस्थिती अशी झाली की, यूपी सरकारने आयजी लक्ष्मी सिंह यांना रातोरात लखीमपूरला पाठवले, त्यांनी रात्रभर गावात मुक्काम केला.
सुमारे १५ तासांनंतर गुरुवारी सकाळी एसपी संजीव सिंह मीडियासमोर आले. ही पत्रकार परिषद शॉर्ट नोटिसवर असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. म्हणाले- निघासन येथील या घटनेत मुलींना जबरदस्तीने नेले नव्हते. आरोपींनी त्यांना आमिष दाखवून नेले. बलात्कार केला, आणि मग जेव्हा मुली लग्नाच्या मुद्द्यावर अडून बसल्या तेव्हा त्यांनी खून केला.