महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे. संपूर्ण जमीन पाण्याखाली वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
CM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar visit Solapur to inspect flood situation solapur news update
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळच्या सुमारास सोलापूरमध्ये दाखल झाले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.
याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. माढामधील निमगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांचे पीकाचे मोठे नुकसान झाले असून हाती काहीच पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महिला शेतकऱ्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद साधून आपबीती सांगितली.
सोलापूरमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे. माढा तालुक्यातील संपूर्ण पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली आहे.
माढा तालुक्यातील दारफळ सीना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत उपाययोजना सुचवल्या आहेत.
सोलापूर दौरा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे, असे अजित पवारांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला . पूर परिस्थितीमुळे पिकांची नासाडी झाली आहे अनेक घरे बेघर झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.