Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

मोदी कॅबिनेटने केरळचे नाव 'केरळम' करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३ नुसार राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया कशी पार पडते आणि संसदेची भूमिका काय असते, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 07:58 PM
राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? (Photo Credit- AI)

राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • केरळ आता अधिकृतपणे होणार ‘केरळम’!
  • मोदी सरकारची मंजुरी
  • जाणून घ्या राज्याचे नाव बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया
How Can Change Name Of State: गेल्या काही वर्षांत देशातील अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलल्याचे आपण पाहिले आहे. आता या यादीत एका राज्याचे नाव जोडले जाणार आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ (Keralam) करण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटने हिरवा कंदील दिला आहे. या मंजुरीनंतर आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाईल. मात्र, एखाद्या राज्याचे नाव बदलणे ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या कशी असते आणि त्याचे अधिकार कोणाकडे असतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे?

भारतीय राज्यघटनेनुसार, देशातील कोणत्याही राज्याचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार केवळ देशाच्या संसदेला आहे. राज्यघटनेतील ‘अनुच्छेद ३’ (Article 3) संसदेला कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढवण्याचा, सीमा बदलण्याचा किंवा नाव बदलण्याचा विशेष अधिकार प्रदान करतो. या कलमांतर्गतच कोणत्याही राज्याच्या भौगोलिक आणि राजकीय ओळखीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया पार पडते.

Heartiest congratulations to the people of Keralam. The Union Cabinet’s decision under the leadership of Modi Ji to rename Kerala as ‘Keralam’ is a significant step towards fulfilling the long-standing demand of the people of the state. The name ‘Keralam’ will manifest the… pic.twitter.com/XAdXap5HlA — Amit Shah (@AmitShah) February 24, 2026

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

कशी असते नाव बदलण्याची प्रक्रिया?

एखाद्या राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दोन स्तरांवर सुरू होऊ शकते: विधानसभा किंवा संसद.

  • राज्य विधानसभेचा पुढाकार: जर राज्य सरकारला नाव बदलायचे असेल, तर प्रथम तसा प्रस्ताव विधानसभेत बहुमताने मंजूर करावा लागतो. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो.
  • केंद्राची भूमिका आणि NOC: केंद्राने प्रस्तावाला प्राथमिक मान्यता दिल्यास, गृह मंत्रालय, इंटेलिजन्स ब्युरो (IB), भारतीय सर्वेक्षण विभाग, टपाल विभाग आणि रजिस्ट्रार जनरल यांसारख्या विविध विभागांकडून ‘अनापत्ती प्रमाणपत्र’ (NOC) घेणे अनिवार्य असते.
  • संसदेची मंजुरी: केंद्राने हिरवा कंदील दिल्यानंतर हे विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडले जाते. दोन्ही सभागृहात हे विधेयक साध्या बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रपतींची मोहोर: संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ते अंतिम स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. राष्ट्रपतींच्या संमतीनंतरच नाव बदलल्याची अधिकृत अधिसूचना जारी केली जाते.

नाव बदलण्यामागे ठोस कारण आवश्यक

केवळ इच्छा असून चालत नाही, तर नाव बदलण्यामागे सबळ ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा भाषिक कारण देणे बंधनकारक असते. या प्रक्रियेसंदर्भात १९५३ मध्ये गृह मंत्रालयाने स्पष्ट नियमावली तयार केली होती. तत्कालीन उपसचिव सरदार फतेह सिंह यांनी राज्य सरकारांना पत्राद्वारे कळवले होते की, नावातील बदलामुळे राज्याची अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा जपला जाणे आवश्यक आहे.

महिनाभराचा कालावधी आणि प्रशासकीय बदल

राज्याचे नाव बदलण्याची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. एकदा का नाव बदलले की, केवळ कागदोपत्री बदल होत नाहीत, तर सर्व सरकारी कार्यालये, अधिकृत शिक्के, वाहतूक विभाग आणि केंद्र-राज्य करारांमध्येही बदल करावे लागतात. केरळच्या बाबतीत, मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम’ असेच म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भाषिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

Web Title: What is the exact process of changing the name of a state know the legal provisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Central Governement
  • Kerala
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Women’s Reservation Bill : महिलांना मिळणार अधिकार अन् हक्क; महिला आरक्षण ठरणार ऐतिहासिक
1

Women’s Reservation Bill : महिलांना मिळणार अधिकार अन् हक्क; महिला आरक्षण ठरणार ऐतिहासिक

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
2

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन
3

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये PM मोदींचा एल्गार; प्रत्येक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा लागणार छडा
4

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये PM मोदींचा एल्गार; प्रत्येक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा लागणार छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.