‘या’ राज्यात केलं जात देशातील सर्वात मोठं रावणदहन, महाकाय रावणासाठी 18 लाख रुपये खर्च!

दसऱ्याच्या मुहूर्तावर पंचकुलामध्ये देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी एकूण 3 महिने लागले. या पुतळ्याची उंची 171 फूट आहे. तसेच ते बनवण्यासाठी एकूण 18 लाख रुपये खर्च आला आहे.

  दसरा म्हणजेच विजय दशमी (Vijayadashami) हा सण आज 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण आणि त्याचे दोन भाऊ मेघनाथ आणि कुंभकरण यांचे पुतळे ठिकठिकाणी बनवून त्यांचे दहन केले जाते. हे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविण्यासाठी केले जाते. भारतात अशी अनेक शहरे आहेत जिथे रावण दहन मोठ्या दिमाखात साजरे केले जाते आणि ते पाहण्यासाठी परदेशातून लोक मोठ्या संख्येने येतात.

  रावणाचा देशातील सर्वात उंच पुतळा

  आजतकच्या वृत्तानुसार, दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने काही स्पर्धांचेही आयोजन केले जाते, त्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे रावणाचा पुतळा बनवण्याची स्पर्धा. यावर्षी पंचकुलामध्ये देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याची एकूण उंची 171 फूट आहे. हा पुतळा देशभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील शालीमार मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. हा कार्यक्रम पंचकुलाच्या श्री माता मनसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट (दसरा कमिटी) आणि श्री आदर्श रामलीला ड्रॅमॅटिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.

  रावण बनवण्यासाठी ‘इतके’ लाख खर्च झाले

  रावणाचा हा पुतळा तयार करण्यासाठी एकूण 18 लाख रुपये खर्च झाले आहेत. जर आपण वेळेबद्दल बोललो तर हा पुतळा तयार करण्यासाठी 25 कारागिरांना एकूण 3 महिने लागले. तसेच रावणाचा पुतळा बनवण्यासाठी सुमारे २५ क्विंटल लोखंड, ५०० बांबू, ३ हजार मीटर लांब चटई आणि ३५०० मीटर कापडाचा वापर करण्यात आला. याशिवाय रावणाचा चेहरा बनवण्यासाठी सुमारे 1 क्विंटल फायबरचा वापर करण्यात आला आहे.

  रावणाच्या आत इको फ्रेंडली फटाके

  पर्यावरणाचा विचार करून रावणाच्या आत इको-फ्रेंडली फटाके बसवण्यात आले असून, हे फटाके तामिळनाडूतून आणण्यात आले आहेत. रावणाच्या या भव्य पुतळ्याचे दहन रिमोटद्वारे केले जाणार आहे. रावण दहनाच्या आधी कार्यक्रमात भजन आणि कीर्तनही गायले जाईल. अशा परिस्थितीत या दसरा सोहळ्याला हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.