सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खडे बोल सुनावत खुले आव्हान दिले आहे. उठसूट आरोप करणे सोपे आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलो तर तर खूप महागात पडेल, अवघड होईल. सांगली जिल्ह्यातील सहकार कोणी मोडीत काढला ? कारखानदारी कोणी मोडीत काढली? बँका कोणी बुडवल्या? अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली . खासदार विशाल पाटील हुशार आहेत, पण आम्ही दुधखुळे नाही. आम्ही टीमवर्क करतो. खासदारांनी टीका करताना चार बोट त्यांच्याकडे असतात हे लक्षात ठेवावे असे खडे बोल सुनावले. तसेच विशाल पाटील यांना चर्चेचं दिलेल खुल आव्हान त्यांनी स्वीकारावं असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले.