विषारी सापांची(snake) भीती प्रत्येकालाच वाटत असते. कारण विषारी सापाने(venomous snake) डंख मारला तर जीव जाण्याची शक्यता असते. आजकाल साप चावल्यामुळे माणसांचाच नाही तर प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटनाही वाढत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा सापाविषयी माहिती सांगणार आहोत जो ७७ फूट(२३ मीटर) लांब(77 feet long snow snake) आहे.
सोशल मीडियावर सध्या एका सापाचे फोटो व्हायरल(photos viral on social media) झालेे आहेत. हा साप बर्फापासून बनवण्यात आला आहे. मॉन मूजली आणि त्यांच्या ५ भावंडांनी मिळून १० तासांमध्ये हा ७७ फूट लांब साप बनवला आहे. त्यांच्या या क्रिएटीव्हिटीची सगळे जण स्तुती करत आहेत. या सापाचे फोटो बघण्यात नेटकरी गुंग झालेले दिसतात.
[read_also content=”कॅलरी बर्न करण्यात महिला पुरुषांच्या मागे,शारिरीक हालचाली कमी झाल्याने करावा लागतोय विविध आजारांचा सामना https://www.navarashtra.com/health-news-marathi/women-facing-health-problem-due-to-less-physical-activity-in-a-day-nrsr-96861/”]
इन्स्टाग्रामवर Mello Morn ने या सापाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा साप बनवण्यासाठी आधी त्याच्या आकाराची आऊटलाईन तयार करण्यात आली. त्यानंतर स्प्रे पेंटींग करुन त्याला रंग देण्यात आला. त्यामुळे हा साप अधिक चांगला दिसत आहे.






