KKR Vs GT Live Streaming (फोटो- ट्विटर)
केकेआरचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
नरेंद्र मोदी स्टेडियमर सुरू आहे सामना
Tata IPL 2026 GT Vs KKR Live Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र केकेआरचा निर्णय फारसा फायदेशीर दिसून आला नाही. केकेआरने प्रथम (IPL2026) फलंदाजी करताना रन्स केले आहेत. केकेआरने गुजरात टायटन्सला 181 रन्सचे टार्गेट दिले आहे.
केकेआरची फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या केकेआरकडून अजिंक्य रहाणे आणि टीम सायफर्ट सलामीला खेळण्यासाठी मैदानात आले. मात्र संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 1 चेंडू खेळून आउट झाला. तो एकही रन करू शकला नाही. त्यानंतर अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला. केकेआरने पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्या. टीम सायफर्ट 19 रन्स करून आउट झाला.
कॅमेरून ग्रीन आणि रोममेन पोवेलने केकेआरचा डाव सांभाळला. रींकू सिंगला 5 व्या सामन्यात देखील चांगली खेळी करता आलेली नाही. या सामन्यात देखील तो केवळ 1 रन करून आउट झाला. तर अनुकूल रॉयने 9 रन्स केल्या. रमण दीप सिंहने 17 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. सुनील नरेन 0 रन करून आउट झाला. ग्रीनने 79 रन्सची महत्वाची खेळी केली. अखेर आजच्या सामन्यात ग्रीनला सूर गवसलेला दिसून आला.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने अजिंक्य रहाणेला आउट केले. तर कागिसो रबाडाने अंगरीक्ष रघुवंशी आणि टीम सायफर्टची विकेट पटकावली. मात्र रोममेन पोवेल 20 चेंडूत 27 रन्सची खेळी केली. अशोक शर्माने रोममेन पोवेलची विकेट पटकावली. कागिसो रबाडाने आपल्या स्पेलमध्ये एकूण तीन विकेट्स घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने अनुकूल रॉयला आउट केले. अशोक शर्माने रमणदीप सिंहची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने सुनील नरेनची विकेट घेतली. गुजरातच्या गोलंदाजांनी केकेआरच्या संघाला ऑल आउट केले.
GT Vs KKR Playing 11: कॅमेरून ग्रीनचा पत्ता कट होणार की…? काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार , अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन,अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






