टाटा सिएराला बसला धक्का! Cameron Green सिक्सरने केला घात (फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या काही सामन्यांपासून कॅमरून ग्रीन खेळत नसल्याने त्याच्यावर जोरदार टीका झाली होती आणि या सामन्यात ग्रीनने सर्वांची तोंडं बंद केली. कोलकाता नाईट रायडर्ससाठी ग्रीनने सर्वाधिक रन्स केल्या आणि एक चांगले टारगेट सेट करून दिले. मात्र यावेळी कॅमरूनने मारलेल्या सिक्सरमुळे प्रायोजक टाटाची नवी कार खराब झाली असल्याचे दिसून आले. त्याच्या या सिक्सरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
KKR Vs GT Live: मैदानावर फक्त ‘ग्रीन’ सिग्नल! गुजरात टायटन्सला विजयासाठी दिले कठीण आव्हान
कारच्या गेटवर पडला डेंट
𝙂𝙧𝙚𝙚𝙣 𝙨𝙬𝙞𝙣𝙜𝙨, 𝙘𝙖𝙧 𝙨𝙪𝙛𝙛𝙚𝙧𝙨 💥 🚗#CameronGreen connects, clears the ropes, & sends it crashing onto the car for a MAXIMUM! 🤯#TATAIPL | #IPLRivalryWeek 2026 ➡️ #GTvKKR | LIVE NOW 👉https://t.co/jRYOdM0YaS pic.twitter.com/pt2NYUGhQr — Star Sports (@StarSportsIndia) April 17, 2026
कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १३ व्या षटकात, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा गोलंदाजी करत होता. षटकातील तिसरा चेंडू १४६ किमी प्रतितास वेगाने टाकला जात होता. कॅमेरॉन ग्रीनने तो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एका उत्तुंग षटकारासाठी मारला. हा षटकार थेट टाटा सिएरावर जाऊन आदळला, ज्यामुळे कारच्या डाव्या बाजूच्या पुढच्या दरवाजावर एक डेंट पडला.
कॅमेरॉन ग्रीनने ७९ धावा केल्या
केकेआरसाठी कॅमेरॉन ग्रीनने ७९ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये संघाने तीन विकेट गमावल्या. ग्रीन सुरुवातीला सावकाश फलंदाजी करत होता. एके वेळी तो २९ चेंडूंमध्ये २७ धावांवर होता, पण नंतर त्याने ३४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो ७९ धावांवर बाद झाला. आपल्या ५५ चेंडूंच्या खेळीत ग्रीनने चार षटकार आणि सात चौकार मारले.
ऑस्ट्रेलियाचा ग्रीन, केकेआरने लिलावात २५.२० कोटी रुपयांना विकत घेतला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडूदेखील आहे. त्याची ही किंमत असली तरीही त्याने आतापर्यंत खेळात कोणतीही कमाल न केल्यामुळे मागच्या आठवड्यात त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती.
KKR Vs GT Live: ‘ग्रीन’ वादळात गुजरातचे ‘टायटन्स’ उडाले; 79 रन्सची तडाखेबंद खेळी
शेवटच्या पाच षटकांत केवळ ३२ धावा झाल्या
नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा संघ २० षटकांत केवळ १८० धावाच करू शकला. १५ षटकांनंतर संघाची धावसंख्या १४८ होती. गुजरातने अखेरच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. १६व्या ते १८व्या षटकांदरम्यान ग्रीनने केवळ एका चेंडूचा सामना केला. गुजरातकडून कागिसो रबाडाने तीन बळी घेतले, तर अशोक शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.






