Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाला पहिली मालिका जिंकण्याची संधी; राहुलच्या पुनरागमनामुळे कोण बाहेर जाणार ?

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते हा सामना बघण्यास खूप उत्सुक आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता दुसरा सामना जिंकून संघाला मालिकेत २-० अशी मोठी आघाडी घ्यायची आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 09, 2022 | 09:47 AM
टीम इंडियाला पहिली मालिका जिंकण्याची संधी; राहुलच्या पुनरागमनामुळे कोण बाहेर जाणार ?
Follow Us
Close
Follow Us:

राहुलच्या पुनरागमनामुळे कोण बाहेर जाणार ?

शिखर धवन आणि टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार आहेत. राहुलच्या पुनरागमनामुळे संघात इशान किशन किंवा ऋषभ पंत यांना बाहेर व्हाव लागेल. गेल्या सामन्यात ११ धावा करून पंत बाद झाला, तर ईशानच्या बॅटमधून २८ धावा घेतल्या. याआधी पंत आफ्रिका दौऱ्यावरही फॉर्ममध्ये दिसला होता. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन इशान किशनला फलंदाज म्हणून खेळवू शकते.

धवन रोहितचा जोडीदार होऊ शकतो, कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहे

धवन आणि श्रेयस अय्यर कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यामुळे दोघेही दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत. दुसऱ्या सामन्यात धवन रोहितसोबत सलामी करू शकतो. त्याचवेळी राहुल मधल्या फळीत खेळताना दिसतो.

वैयक्तिक कारणांमुळे राहुल पहिला सामना खेळू शकला नाही. मधल्या फळीत खेळल्यास पहिल्या सामन्यात ३२ चेंडूत नाबाद २६ धावा करणारा दीपक हुडा बाद होऊ शकतो. विराट कोहली, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्या क्रमवारीत बदल करणे संघ व्यवस्थापनाला आवडणार नाही. दोन वर्षांपासून ७१व्या शतकाची वाट पाहणाऱ्या कोहलीसाठीही हा सामना महत्त्वाचा आहे.

फिरकीपटूंची अपेक्षा

चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला गोलंदाजीत कोणताही बदल करायचा नाही. कुलदीप यादव मंगळवारी प्रचंड घाम गाळताना दिसला. तो फलंदाजीसोबतच गोलंदाजी करताना दिसला. अशा स्थितीत एका फिरकीपटूला वगळले जाऊ शकते आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला सामन्यात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज पुनरागमन करू शकतो

दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील पराभव विसरून वेस्ट इंडिजच्या नजरा अधिक चांगल्या कामगिरीवर असतील. गेल्या १६ सामन्यांमध्ये रविवारी १०व्यांदा वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही. यावर पोलार्डच्या संघाला सुधारणा करावी लागणार असून फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे.

पहिल्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर म्हणाला होता की, फलंदाजांना त्यांच्या विकेटचे महत्त्व समजून खेळावे लागेल. निकोलस पूरन आणि पोलार्ड या आक्रमक फलंदाजांकडून वेस्ट इंडिजला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

Web Title: A chance for team india to win the first series who will be out due to rahuls return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2022 | 09:46 AM

Topics:  

  • Ahemdabad
  • cricket news
  • Ind vs WI
  • KL. Rahul
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड
1

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
2

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
3

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
4

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.