
Abhijit Deepke's First Post After Dharmendra Pradhan's Resignation (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन सुरु होते. यामध्ये दिल्लीतील पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जोरदार मारहाण करण्यात आली. खाणे- पाणी सगळे बंद करुन विद्यार्थ्यांना त्रास देण्यात आला. हे सर्व असताना मात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अभिजित दीपके यांच्या पोस्टमध्ये हाताला पट्टी बांधली असून हातात संविधान घेत Thank You असे लिहित पोस्ट शेअर केली आहे.
Thank you pic.twitter.com/AfQVVVTa10 — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 25, 2026
एकंदरीत, विद्यार्थी आंदोलनानंतर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे देशाचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, विविध नेत्यांची वक्तव्ये आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया यामुळे हा विषय अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतात आणि शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
या आंदोलनात देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही पाठिंबा दिला होता. काही कलाकारांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले, तर काहीजण प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पोहोचले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा केवळ राजधानीपुरती मर्यादित न राहता देशभरात झाली. सोशल मीडियावरही या घडामोडींवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण विद्यार्थ्यांच्या संयम आणि एकतेचे कौतुक करत आहेत, तर काहींच्या मते शिक्षण व्यवस्थेतील उर्वरित प्रश्नांवरही तितक्याच गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे हा विषय अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
“My Dear Cockroach….” म्हणत प्रकाश राज यांनी पोस्ट टाकत cjpचे केले अभिनंदन