Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा ट्विस्ट वाढला;  ओम बिर्ला- के. सुरेश मैदानात

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 25, 2024 | 02:22 PM
सौजन्य- टीम नवराष्ट्र

सौजन्य- टीम नवराष्ट्र

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  18व्या लोकसभेच्या पहिल्या संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी (24 जून) लोकसभेत 280 खासदारांनी शपथ घेतली. आज (25 जून) दुसऱ्या दिवशी उर्वरित २६४ खासदार लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेत आहेत. पण सध्या लोकसभा अध्यक्षपदावरून महायुती आणि महाआघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुरूवातीला लोकसभा अध्यक्ष हे महायुतीचे असतील अशी चर्चा सुरू होती. त्यासाठी काँग्रेसने त्यांना पाठिंबाही दर्शवला.  पण लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा नियम आहे. याबाबत काँग्रेसने मागणी केली असता भाजपकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे आता काँग्रेसनेही लोकसभा अध्यक्षपदावर दावा करत आपला उमेदवार उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजप आणि काँग्रेसच्या या रस्सीखेचीमुळे आता लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (26 जून)  होणार आहे. आज भाजपकडून आज ओम बिर्ला यांनी तर विरोधक पक्षांच्या वतीने काँग्रेस नेते के. सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एनडीए आणि इंडिया मध्ये  आरपारची लढाई

भारताच्या इतिहासात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांनी  केंद्र सरकार विरोधी पक्षाला उपसभापतीपद देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आता विरोधी पक्षही लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विरोधक लढवतील, असे स्पष्ट केले.

कोण आहेत. के सुरेश ?

कोडीकुन्नील सुरेश म्हणजेच के सुरेश हे केरळच्या मावेलीकारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 1989 पासून ते ही जागा सांभाळत आहेत. त्यांना लोकसभेचा सर्वाधिक अनुभव आहे. ते आतापर्यंत 7 वेळा खासदार झाले आहेत. तसेच के. सुरेश 2012 ते 2014 या काळात काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. 2018 मध्ये त्यांना केरळ काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. ते एआयसीसीचे सचिवही राहिले आहेत.

ओम बिर्ला की के. सुरेश,  कोण दिसणार स्पीकरच्या खुर्चीवर?

18 व्या लोकसभेत सभापती आणि उपसभापतींचा चेहरा जवळपास स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा ओम बिर्ला स्पीकरच्या खुर्चीवर दिसणार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांना प्रथमच सभापती करण्यात आले होते . सभागृहात कडक प्रशासक अशी त्यांची प्रतिमा आहे.  तर के. सुरेश यांच्याबद्दल सांगायचे तर ते केरळमधील मावेलिकारा येथून खासदार आहेत. ते ८व्यांदा खासदार म्हणून निवडून आले असून त्यांना लोकसभा सदस्य म्हणून सर्वाधिक अनुभव आहे.

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून म्हणजेच उद्या होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. विरोधी पक्षानेही या पदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. कनिष्ठ सभागृहाच्या सभापती पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यानंतर  लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपसभापतींची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमतीने होत आहे. 543 सदस्यांच्या लोकसभेत, एनडीएकडे 293 खासदार आहेत आणि त्यांना स्पष्ट बहुमत आहे, तर विरोधी इंडिया ब्लॉककडे 234 खासदार आहेत.

 

Web Title: An election will be held between om birla and k suresh for the post of lok sabha speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 01:47 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Om Birla
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.