पोलिस कर्मचाऱ्याकडून इसमास बेदम मारहाण)
रत्नागिरी: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. या घटना कमी होताना दिसून येत नाहीयेत. बदलापूर प्रकरण, पुण्यातील वानवडी अत्याचार प्रकरण, बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण आणि राज्यभरात अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पोलीस देखील गंभीर असून, अशा प्रकरणात कठोर कारवाई केली जात आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. फक्त यात मुलीनी छेड काढणाऱ्याला धडा शिकवला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी एक कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर या कॉलेजच्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने केलेल्या कृत्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. एका मुलीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या मैत्रिणींनी त्या कंडक्टरला चांगलाच धुतला आहे. दापोली येथे बसमध्ये बसलेल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे.
बस कंडक्टरने विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर बसमधील इतर विद्यार्थिनींनी कंडक्टरला चोप चोप चोपले आहे. एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगले सुनावले आणि धोपटले देखील आहे. मुलींचा हा रौद्र रूप पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमा झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरळ होताना पाहायला मिळतो आहे. तर या प्रकरणी कंडक्टरविरुद्ध दाभोळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यात स्कूल बसमध्ये लहान मुलीवर अत्याचार
लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला आहे. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्यामध्ये वातावरण तापले आहे. पालकांनी रोष व्यक्त केला असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.