Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar : अखेर त्या संशयास्पद सापडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी छडा लावला, मित्रांनीच केली हत्या, कारण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 18, 2025 | 01:15 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे. त्याच्या छातीवर व हातावर गंभीर जखमा दिसून आल्याने गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेचा पोलिसांनी छडा लावला असून एका आरोपीला अटक केली आहे.

‘आवाज केला तर तुला…’; मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी केली चोरी, दागिन्यांसह रक्कमही लंपास

नेमकं काय घडलं?

मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी, गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रमेश नवथर याची अज्ञाताने गोळी झाडून हत्या झाल्याची बाब समोर आली होती. गंगापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. मृत राहुल नवथर सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) या दोन मित्रांसह भिवधानोरा शिवारातील गट क्र. 306 मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. मावस व नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी राहुलच्या डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यावर, तर तिसरी पोटात लागल्याने राहुल जागीच मृत्युमुखी पडला. मृतदेह तसाच सोडून मावस आणि नागे घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. याप्रकरणी मृत राहुलचा भाऊ महेश नवथर यांनी कानिफनाथ मावस याने राहुलला गोळ्या घातल्याची आणि त्यासाठी योगेश नागे याने त्यास मदत केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आरोपी मावस आणि नागे यांनी राहुलवर का गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

आरोपी योगेश नागे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी बुधवारी (१७ सप्टेंबर) पहाटे तीनच्या सुमारास नेवासा फाटा येथे बेड्या ठोकल्या. गुन्ह्यातील दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाइल बंद करून ठेवल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar the murder was committed by friends what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
1

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
2

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
4

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.