Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन उन्नत महामार्ग प्रकल्प पुण्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार असून औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 09:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नमूद केले.
  • मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नमूद केले.

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन

पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविध वाहतूक जोडणी या संकल्पनेवर आधारित असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क उपलब्ध होऊन मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे हे केवळ विद्येचे माहेरघर नसून उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. पुणे मेट्रो, रिंग रोड, विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार, पिंपरी-चिंचवड व हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम प्रभावीपणे सुरू असल्याचे श्रीमती पवार यांनी नमूद केले. नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगून, भूसंपादनातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

Web Title: The routes giving new momentum to punes development will prove to be game changers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • pune news
  • pune news update
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!
1

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…
2

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
3

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
4

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.