कुमार सप्तर्षी यांचे निधन (फोटो- सोशल मिडिया)
डॉ. कुमार सप्तर्षी हे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांचे वय 85 इतके होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जण्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गांधीवादी आणि समाजवादी चळवळीतील एक आवाज हरपला असल्याचे म्हटले जात आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना अस्वस्थ वाटू लागण्याने पुण्यातील एका रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी सांध 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर येत आहे.
रोहित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह… pic.twitter.com/dO0lZrNJdU — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2026
विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. सप्तर्षी हे प्रभावी लेखक, वक्ते म्हणून देखील लोकप्रिय होते. विषमता, अन्याय, भ्रष्टाचार याविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठवला. राजकीय, सामाजिक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी विविध भाषणे, लेख यांमधून समाजातील प्रश्न मांडले. त्यावर भाष्य केले.






