Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवी घेणार नवा अवतार, मालिकेच्या कथानकाला मिळणार एक नवे वळण…

आई तुळजाभवानी मालिका गूढ आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली. देवीने घेतलेले बालरूप, तिच्या दैवी लीलांचे सूक्ष्म संकेत, सटवाईसमोरचा भविष्यलेखनाचा पेच आणि महिषासुराचा उन्मत्त अहंकार या सर्वांची एकसंध वीण प्रेक्षकांना भावते

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 06, 2025 | 04:55 PM
'आई तुळजाभवानी' मालिकेत देवी घेणार नवा अवतार, मालिकेच्या कथानकाला मिळणार एक नवे वळण…

'आई तुळजाभवानी' मालिकेत देवी घेणार नवा अवतार, मालिकेच्या कथानकाला मिळणार एक नवे वळण…

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी ही मालिका सध्या एका अत्यंत गूढ आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. देवीने घेतलेले बालरूप, तिच्या दैवी लीलांचे सूक्ष्म संकेत, सटवाईसमोरचा भविष्यलेखनाचा पेच, आणि महिषासुराचा उन्मत्त अहंकार या सर्वांची एकसंध वीण प्रेक्षकांना भावत आहे. याच कथानकाला एक नवे वळण मिळणार आहे, कारण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आई तुळजाभवानीचे बालरूप जगदंबा. तेव्हा मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

अखेर अखिल आणि जैनब अडकले लग्नबंधनात; ३ वर्षाच्या डेटिंगनंतर झाले एकमेकांचे सोबत!

पाळण्यात झुलणाऱ्या एका निरागस बाळाला चिंताग्रस्त गंगाई जोजवत आहे. तिला चिंता आहे बाळाच्या बारशाची कारण कोणाही गावकरी स्त्रिया या बारशाला आलेल्या नाहीत.या नाजूक भावनिक क्षणात आकाशात दिव्य तेजात न्हालेल्या पाच देवी प्रकट होतात. त्या हळूहळू साध्या स्त्री वेशात गंगाईसमोर अवतरतात. गंगाई भावविवश होऊन त्यांच्यासमोर नम्र विनंती करते “माझ्या बाळाचं बारसं तुमच्या हातून होऊ देत”. त्या पाच देवी एकमेकींकडे पाहत स्मित करतात आणि एकसाथ बाळाच्या कानात म्हणतात “कुर्र्र्र्र… जगदंबा!”

निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, “सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…”

हातात गुंफलेल्या कवड्या, निरागस हास्य आणि पाणीदार टपोरे डोळे, कपाळावर असलेला तेजस्वी मळवट म्हणजेच लहानगी जगदंबा तिचे हे लोभस रूप प्रेक्षकांना नक्कीच भावेल. तिच्या पावलांनी भूमीला स्पर्श होताच भूमी सोनेरी चमकते. बालरूपातली ही देवी म्हणजेच भविष्यात महिषासुराचा नाश करणारी शक्ती आहे. देवीचा हा बालावतार म्हणजे निव्वळ निरागसता नसून, त्यामागे आहे प्रचंड शक्ती आणि नियतीने ठरवलेलं एक महत्त्वाचं युगप्रवर्तक कार्य आहे.

Spirit नंतर दीपिका पदुकोण ‘या’ बिग बजेट चित्रपटातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटी ऐकून निर्मातेही बुचकळ्यात

सध्या मालिकेत देवीने महिषासुराचा अंत करण्यासाठी बालरूप धारण केले आहे. मात्र, या लीलेचं कोडं सटवाईसुद्धा सोडवू शकलेली नाही. तुळजाचं मानवी भविष्य लिहिण्याचं दायित्व तिच्यावर आहे, पण हे भविष्य तितकंसं सोपं नाही. दुसरीकडे, महिषासुराला हे संकेत स्पष्ट समजले आहे, पण त्याचा गर्व आणि उन्मत्तवृत्ती हे मान्य करायला तयार नाही. “भविष्य मी घडवतो” या गर्वात तो तुळजाला मिळवण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे.

तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी, सोम ते शनि, रात्री ९ वा. केवळ आपल्या कलर्स मराठीवर!

Web Title: Colors marathi serial aai tuljabhavani in devi tuljabhavani bal jagdamba form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

‘आनंदी’नंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
1

‘आनंदी’नंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी मालिकेत भावनिक वळण, RK दिसणार पोतराजच्या रूपात; समीर परांजपेसाठी मोठं आव्हान
2

मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी मालिकेत भावनिक वळण, RK दिसणार पोतराजच्या रूपात; समीर परांजपेसाठी मोठं आव्हान

Exclusive: ‘कोणत्याही भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारावं’, सोनाली पंडितचा 10 वर्षांनी मराठीत कमबॅक
3

Exclusive: ‘कोणत्याही भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारावं’, सोनाली पंडितचा 10 वर्षांनी मराठीत कमबॅक

३६ वर्षांपूर्वीचा तो प्रसिद्ध टीव्ही शो, ज्याच्या सेटवर ५२ लोकांनी गमावला जीव, ६० एपिसोड झाले टेलीकास्ट
4

३६ वर्षांपूर्वीचा तो प्रसिद्ध टीव्ही शो, ज्याच्या सेटवर ५२ लोकांनी गमावला जीव, ६० एपिसोड झाले टेलीकास्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.