देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल (6 एप्रिल) देशभरात पाच हजारांहून अधिक लोक कोरोना पॅाझिटिव्ह आढळले, जे या गेल्या सहा महिन्यांतील जास्त रुग्णसंख्या आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
नवीन रुग्ण वाढीसह देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 25,587 वर पोहोचली आहे. बुधवारी 2,826ड रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दैनंदिन चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. शेवटच्या दिवशी 1.60 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 3.32 टक्के संक्रमित आढळले. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 2.89 टक्के आहे. 826 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना रुग्णांत वाढ होत असताना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दैनंदिन चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. शेवटच्या दिवशी 1.60 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 3.32 टक्के संक्रमित आढळले. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 2.89 टक्के आहे.
21 राज्यांतील 72 जिल्ह्यांना रेड अलर्ट
21 राज्यांतील 72 जिल्हे रेड अलर्ट अंतर्गत आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात 12 ते 100 टक्के सॅम्पल कोरोना बाधित आढळले आहेत. शुक्रवारी होणार्या बैठकीत कोविड दक्षतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती प्राप्त झाली असून, अधिक संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांबाबत चर्चा केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात. याशिवाय गर्दी नियंत्रणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही या भागात लागू होऊ शकतात. तेथे मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात. याशिवाय गर्दी नियंत्रणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही या भागात लागू होऊ शकतात.