एकीकडे नवरात्रीचा उत्सव… देवीच्या भक्तीत तल्लीन झालेले भक्त..गरब्याच्या तालावर थिरकणारी पावलं..मात्र याच उत्सवाच्या माध्यमातून अकोल्यातील योगायोग नवदुर्गा महोत्सवने समाजासमोर उभं केलंय ते एका बळीराजाचं विदारक वास्तव..राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पावसाअभावी हातची पिकं गेली, डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला, मुलीच्या शिक्षणाची चिंता सतावतेय आणि सावकाराच्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याची व्यथा मंडळाने जिवंत देखाव्यातून मांडली आहे. हा देखावा पाहताना अनेकांचे डोळे पाणावले, तर बळीराजाच्या वेदनांनी उपस्थितांचं मन हेलावून गेलं.