जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू होते. चार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवाळ व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हजर होते. आदिवासी बांधवांकडे लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व शिष्टमंडळाने चर्चेत भाग घेतला. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.