कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या (Koregaon Nagar Panchayat) नगराध्यक्षपदासाठी, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दीपाली महेश बर्गे यांचे नाव निश्चित केले. आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) प्रणित कोरेगाव परिवर्तन आणि शिवसेना आघाडीचे एकूण १३ नगरसेवक निवडणूक आल्याने कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दीपाली महेश बर्गे यांची निवड मानली जाते. कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विधानसभेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे प्रणित परिवर्तन आणि शिवसेना आघाडी विरुद्ध विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस अशी समोरासमोर अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये आमदार महेश शिंदे प्रणित आघाडीच्या 17 पैकी 13 नगरसेवक निवडणू आले.
आमदार शशिकांत शिंदे प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक विजयी झाले होते. कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी वर्चस्व मिळवले. कोरेगाव नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक 10 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. नगराध्यक्पद सर्वसाधारण महिलावर्गाला राखीव आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वानुमते नगरसेविका दिपाली महेश बर्गे याचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आला. 13 नगरसेवक पाठीमागे असल्याने दिपाली बर्गे याची नगराध्यक्ष पदी निवड निश्चित मानली जाते.