Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे. ही पहिली थेट रेल्वे सेवा असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटकांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 02:35 AM
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू;  रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
Follow Us
Follow Us:

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू
रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण

पुणे: पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविक आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज १७ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल.

या थेट रेल्वे सेवेमुळे भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण होत आहे. ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे. ही पहिली थेट रेल्वे सेवा असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटकांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे. सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी प्रवास उपलब्ध झाल्यामुळे वृद्ध भक्तांची मोठी सोय होईल.

स्थानिक अर्थव्यवस्था आणि शिक्षणाला गती

या रेल्वेमुळे केवळ धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. शिर्डी परिसरातील हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक आणि छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होईल. तसेच, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील रहिवाशांना पुण्यातील उच्च शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असेल थांबा

दौंड कॉर्ड केबिन: पुणे आणि मनमाड मार्गादरम्यान जलद प्रवासासाठी उपयुक्त.

श्रीगोंदा: स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.

अहिल्यानगर: प्रशासकीय व लष्करी केंद्रातील नोकरदारांसाठी सोयीचे.

राहुरी: येथील ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील’ विद्यार्थी आणि संशोधकांना मोठा लाभ.

बेलापूर: साखर कारखान्यांचे क्षेत्र आणि प्रसिद्ध ‘शनि शिंगणापूर’ मंदिराचे प्रवेशद्वार

Indian Railways: भारतीय रेल्वेचा हायटेक प्लॅन! ट्रॅकच्या देखरेखीसाठी AI तंत्रज्ञान, तर प्रवासासाठी येणार ‘कंपोझिट स्लीपर्स’

‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट प्रकिया सुधारण्यासाठी, पश्चिम मध्य रेल्वेच्या (WCR) कोटा विभागाने आपल्या सर्व स्थानकांवर टोकन प्रणाली सुरू केली आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांची सोय वाढवणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि तिकीटाच्या ठिकाणी लागणाऱ्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: First direct daily express train between pune and sainagar shirdi lstarted at 17 june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • central railway
  • pune news
  • shirdi news

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
2

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
3

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
4

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.