फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart ने आता UPI मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. Flipkart ने Super Money नावाचे पेमेंट ॲप लाँच केले आहे. Flipkart चे Super Money पेमेंट ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. यापूर्वी २०१६ मध्ये Flipkart ने PhonePe विकत घेतले होते. पण Flipkart २०२२ मध्ये PhonePe पासून वेगळे झाले. सध्या दोन्ही कंपन्या वॉलमार्टच्या मालकीच्या आहेत. PhonePe पासून वेगळे झाल्यानंतर Flipkart ने आता स्वत:चे पेमेंट ॲप लाँच केले आहे.
वापरकर्ते Google Play Store वरून Super Money पेमेंट ॲप डाऊनलोड करू शकतात. या अॅप मधील युजरची संपूर्ण माहिती सुरक्षित राहणार आहे. तसेच अॅप वारपताना युजर्सना एक वेगळाच अनुभव येणार आहे. अॅपच्या वापरानंतर युजर्सने दिलेल्या फीडबॅकनुसार या अॅपमध्ये बदल केले जाणार आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. या अॅपमधून पेमेंट केल्यानंतर युजर्सना कॅशबॅकची सुविधा देखील मिळणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, ग्राहकांना कोणतेही निरूपयोगी कूपण किंवा स्क्रॅच कार्ड दिले जाणार नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Flipkart ग्रुप फर्मद्वारे सुपर मनी ॲपवर सध्या काम सुरु आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सच्या व्यवहारांची आणि डेटाची पूर्ण काळजी घेतली जात आहे. हे अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी ॲपच्या इंटरफेसवरही विशेष लक्ष दिले जात आहे. आगामी काळात युजर्सकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार कंपनी Super Money ॲपमध्ये बदलही करू शकते.
सध्या अनेक पेमेंट अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने देखील त्यांचे पेमेंट अॅप amazon pay लाँच केले आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात amazon pay चा वापर केला जातो. अशातच आता Flipkart ने Super Money नावाचे पेमेंट ॲप लाँच केले आहे. Flipkart चे हे Super Money पेमेंट ॲप Amazon च्या amazon pay ला टक्कर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.