Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC च्या निशाण्यावर पाकिस्तान; खेळपट्टीपासून हॉटेलपर्यंत होणार चौकशी; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाच सदस्यीय समित केली गठीत

ICC Delegation in Pakistan : ICC ने पाकिस्तानवर करडी नजर टाकली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करीत पाकिस्तानला पाठवली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 17, 2024 | 06:43 PM
ICC Delegation to meet Pakistan officials

ICC Delegation to meet Pakistan officials

Follow Us
Close
Follow Us:

ICC Delegation to meet Pakistan officials : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी कशी आहे, मैदानाच्या दुरुस्तीचे काम किती काळ चालेल आणि इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी काही आयसीसी अधिकारी पाकिस्तानात येणार आहेत. Cricbuzz नुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पाच जण मंगळवारी पाकिस्तानात उतरणार आहेत. हे पाच अधिकारी पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा आढावा घेतील आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

संघ सरावासाठी मैदान आणि सुविधांचा आढावा

आयसीसीकडून येणारा संघ सरावासाठी मैदान आणि सुविधांचा आढावा घेईल. याशिवाय पाकिस्तानमधील खेळाडूंच्या हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयींवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. पाच अधिकाऱ्यांचे पथक हॉटेल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापनाला भेटून खेळाडूंच्या वास्तव्यानंतर त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील याची माहिती घेणार आहेत.

आयसीसी संघ प्रथम कराचीमध्ये प्रदान केलेल्या सुविधांचा आढावा घेईल, त्यानंतर संघ 20 सप्टेंबर रोजी इस्लामाबादला जाईल आणि आठवड्याच्या शेवटी लाहोरमध्ये प्रदान केलेल्या सुविधांचा आढावा घेईल. 21 सप्टेंबर रोजी सर्व अधिकारी परतणार आहेत. आयसीसीने पाठवलेल्या टीममध्ये वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर, इतर इव्हेंट मॅनेजर, सिक्युरिटी मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर आणि क्रिकेटचे जनरल मॅनेजर यांचा समावेश असेल.

सुरक्षा प्रणाली तपासणी
पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी सुरू असल्याची बातमी आहे. ICC सुरक्षा व्यवस्थापक डेव्हिड मकर, कार्यक्रम प्रमुख ख्रिस टेटली आणि आंतरराष्ट्रीय बोर्ड पिचिंग सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांनी एप्रिलपासून एकूण तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. पाकिस्तानात याआधीही मोठे अपघात घडले असल्याने सुरक्षा व्यवस्था कोणत्याही प्रकारे शिथिल करण्याची बोर्डाची इच्छा नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथील तीनही मोठ्या मैदानांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मैदानात सुरू असलेले बांधकाम वेळेपेक्षा मागे आहे.

ICC Targets Pakistan Everything from Pitch to Hotel will be Inspected Five Member Team formed for Champions Trophy 2025

 

Web Title: Icc targets pakistan everything from pitch to hotel will be inspected five member team formed for champions trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • ICC
  • pakistan

संबंधित बातम्या

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
1

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?
2

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
3

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
4

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.