Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पुढील पाच वर्षात कोकणात 2 लाख रोजगार निर्माण होईल”; प्रमोद जठार यांचं वक्तव्य

महाराष्ट्रात महायुतीला अभुतपुर्व असे यश; एक है तो सेफ है..जनतेचा कौल, काय म्हणाले प्रमोद जठार, जाणून घ्या. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 24, 2024 | 04:02 PM
“पुढील पाच वर्षात कोकणात 2 लाख रोजगार निर्माण होईल”; प्रमोद जठार यांचं वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/ भगवान लोके: विधानसभा  निवडणूक निकालानंतर  राज्यात  सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.  याचपार्श्वभूमीवर भाजपाचे प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेत जनेतेचे आभार मानले आहेत. जठार म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीला अभुतपुर्व असे यश मिळाले आहे. “एक है तो सेफ है..” पंतप्रधान  मोदी यांनी दिलेल्या संदेशाला राज्यासह कोकणातील जनतेने पुर्णतः सेफ कौल दिला आहे. आता केंद्रापासुन राज्यापर्यंत सर्वच सत्ता महायुतीची आहे. तसंच खासदार आणि आमदार देखील महायुतीचेच निवडुन आल्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल. पुढील पाच वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्गात २ लाख रोजगार निर्माण होईल. असा विश्वास कोकणाती जनतेला जठार यांनी दिला आहे.

प्रमोद जठार पुढे असंही म्हणाले की,   कोकणातील जनता ठाकरे गटाच्या नादी न लागता महायुतीच्या पाठीशी राहीली आहे. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद मिळवुन देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत ठाकरेसेना विलीन करावी, असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला आहे.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत  जठार  यांच्यासोबत  शिडवणे सरपंच रवींद्र शेटये, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलु सावंत, नरेंद्र भाबल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग –रत्नागिरी या विधानसभेतील ६ आमदार महायुतीचे निवडुन आले आहेत.  महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी कोकणातील जनतेने आमदार निवडुन दिले आहेत. जसं महायुतीला यश मिळालं तसं महाविकास आघाडी का अपयश मिळाले? ही  बाब लक्षात घेतली पाहीजे.

हेही वाचा- Maharashtra Election Result 2024 : एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी वारी करणारे किती आमदार झाले विजयी? कोणाला मिळाला दणका?

उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावताना प्रमोद जठार म्हणाले की, ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी निकालानंतर ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री असे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी, उबाठाच्या लोकांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले, असा आरोप जठारांनी केला.

हेही वाचा- सावंतवाडीत दीपक केसरकरांचा विजयी चौकार ; ठाकरे गटाच्या राजन तेलींवर केली मात

प्रमोद जठार यांनी यावेळी ठाकरे गटातील अंतर्गत वादाचा देखील मुद्दा उपस्थित केला आहे. जठार म्हणाले की,       सुषमा अंधारे यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार या दोघांचा निषेध केला.चेहरा जाहीर केला नाही,म्हणुन पराभव झाल्याचे मत अंधारे यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी त्यांच्यातच बंडखोरी झाली त्याचे पडसाद उमटले आहेत. राजापुरमध्ये अविनाश लाड यांनी बंडखोरी केली, त्यामुळे साळवी पराभूत झाले, असा टोला देखील प्रमोद जठार यांनी लगावला आहे.

महायुतीच्या कामाबद्दल बोलताना जठार म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात गेल्या सहा महिन्यात फक्त घोषणा केली नाही तर काम ही करुन दाखववलं . शेतकऱ्यांचे वीज बिल माफी ,लाडकी बहिण योजनेचे थेट पैसे जमा केले. त्यामुळे लोकांना हे अंमलबजावणी करणारे सरकार दिसून आले. महायुतीतील नेते मुख्यमंत्री पदासाठी भांडत राहीले नाहीत. त्यामुळेच महायुतीला राज्यात अनपेक्षीत बहुमत मिळाले. दरम्यान कोकणात खासदार नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे वादळ निर्माण करणार आहोत.महायुती आजपासून कामाला लागली आहे. नाणार प्रकल्प लोकांना नको असेल तर ज्याठिकाणी आवश्यक असेल तिथे होईल. शेतकरी तयार असल्यास खासदार राणेंच्या नेतृत्वासाठी नाणारसाठी प्रयत्न केला जाईल. बाळासाहेबांचा शब्द काँग्रेसकडे हिंदुत्व गहाण ठेवत खरा केला आहे. त्यामुळे खरी बाळासाहेबांची विचारांची शिवसेना एकनाथ शिंदेसोबत आहे, असेही जठार म्हणाले.

केसरकरांनी विशाल परबांचे आभार मानावेत- प्रमोद जठार

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अपक्ष विशाल परब यांनी घेतलेली मतं ही दीपक केसरकर यांना चांगले मताधिक्य देणारी ठरली. जे माझ्या विरोधी पक्षात असलेले मित्र पराभुत झाले आहेत. त्यांनी आहात तिथे सुखी रहा,लोकांच्या कल्याणासाठी काम करा. राजकरणात वेगळ्या पक्षात असलो तरी त्यांनी काम करावे .या सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करावे.कोकणात कात टाकली जात आहे,नकारात्मक विचार चालणार नाही.जगातील चांगल्या गोष्टी आहेत,त्या कोकणी जनतेला हव्या आहेत. त्याचे आड येवू नये. संदेश पारकर उमेदवार असल्यामुळे किमान डिपॉझिट वाचले जर सतीश सावंत किंवा रावराणे असते तर डिपॉझिट जप्त झाले असते, असा टोला प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात ठाकरे गटाला लगावला आहे.

 

Web Title: In the next five years 2 lakh jobs will be created in ratnagiri sindhudurga said pramod jathar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • kankavali
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
4

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.