शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, महापौरांसह १२ नगरसेवकांचा पक्षाला रामराम
ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने विक्रमी असा विजय मिळवून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धक्का चितपट करत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने देखील विजयश्री खेचून आणला आहे. शिंदे गटाला 57 जागा तर अजित पवार यांना 41 जागांवर यश मिळाले आहे. महाविकास आघाडीने 46 जागांवर यश मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे मिळून मिळवलेल्या जागा या शिंदे गटाने मिळवल्यांपेक्षा कमी आहे.
मागील अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले. ठाकरे यांच्यापासून वेगळे होते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सूरतवरुन गुवाहाटी गाठली. या सर्व आमदारांवर त्यावेळी जोरदार टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य काय असेल यांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांनी केलेले बंड आवडले आहे का याची प्रचिती येणार होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी केवळ 5 आमदारांना पराभवाचा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या या पाचही आमदारांना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी हरवले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीच्या बंडावेळी त्या ठिकाणीचे वर्णन करणारे नेते प्रसिद्ध झाले होते. काय झाडी काय डोंगर..असे गुवाहाटीचे वर्णन करणारे शहाजीबापू पाटील यांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. शहाजीबापू पाटील यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केला. 25 हजारांच्या मतांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला. त्याचबरोबर माहिम मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत अशा तिरंगी लढतीमध्ये शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा पराभव झाला. ही जागा मिळवण्यात ठाकरे गटाला यश आले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेल्या यामिनी जाधव यांना देखील पराभवाचा फटका बसला आहे. यामिनी जाधव यांचा 31 हजारांच्या मतांनी पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांनी 80 हजारांहून अधिक मत मिळवून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर संजय रायमूलकर आणि ज्ञानराज चौगुले या दोन आमदारांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. संजय रायमूलकर यांना मेहकर या मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार लढत दिली आहे. ज्ञानराज चौगुले यांना ठाकरे गटाचे नेते प्रवीण वीरभद्राय्या स्वामी यांनी जोरदार टक्कर देत विजय मिळवला. शिंदे गटाचे 5 आमदारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांनी धुळ चारत विजय मिळवला आहे.