Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Result 2026 : ‘निकाल चोरायचा प्रयत्न केला तर घराबाहेरही पडू देणार नाही,’ रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ, निकालात मोठा ट्विस्ट

Gokul Result 2026 : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत फेरमतमोजणीनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी निकाल फिरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 10:15 PM
Rohit pawar on gokul election result

Rohit pawar on gokul election result

Follow Us
Follow Us:
  • फेरमतमोजणीत निकाल बदलला, महायुतीचा उमेदवार विजयी
  • रोहित पवारांचा निकाल फिरवण्याचा आरोप
  • सतेज पाटील यांच्या आघाडीला 13 तर महायुतीला 12 जागा
 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता नव्या वादामुळे चर्चेत आली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या असून महायुतीला 12 जागा मिळाल्याची माहिती आहे. मात्र, एका जागेवरील फेरमतमोजणीनंतर निकाल बदलल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे. (Gokul Result 2026)

गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीच्या कलांमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. मात्र, एका जागेवरील मतांची फेरमोजणी झाल्यानंतर चित्र बदललं.

या फेरमतमोजणीत सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले, तर महायुतीचे अमर पाटील विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बदलामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीच्या जागांची संख्या 13 वर आली, तर महायुतीने 12 जागा मिळवल्या.

Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’

रोहित पवारांचा निकाल फिरवण्याचा आरोप

फेरमतमोजणीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आक्रमक भूमिका घेतली. निवडणुकीचा कौल स्पष्ट असतानाही सत्तेचा गैरवापर करून अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे….!
पण…… आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत.
पण लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे.
घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही..!
@INCMaharashtra
@satejp
@ruturajdyp
#GokulElection2026 #गोकुळ — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2026

निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून निकाल बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. निकाल चोरण्याचा प्रयत्न झाल्यास प्रामाणिक सभासदांकडून तीव्र विरोध होईल, असा इशाराही त्यांनी दिला. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे गोकुळच्या निवडणुकीतील वादाला नवं वळण मिळालं आहे.

महायुतीच्या तीन उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी?

उपलब्ध माहितीनुसार, महायुतीच्या तीन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे. निकालात बदल झाल्यास पुढे कोणती पावलं उचलता येतील, यासाठी वकिलांचाही सल्ला घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे.

गोकुळवर सत्ता कोणाची?

उपलब्ध आकडेवारीनुसार, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 13 जागा, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे समविचारी आघाडीने आवश्यक संख्याबळ मिळवल्याचं चित्र आहे. मात्र, फेरमतमोजणी आणि निकालासंदर्भातील पुढील अधिकृत निर्णयांवर सर्वांचं लक्ष राहणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एका जागेच्या फरकाने राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असल्याने हा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हं आहेत. रोहित पवार यांच्या आरोपांवर निवडणूक यंत्रणा आणि संबंधित पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

Web Title: Gokul result 2026 rohit pawar allegations recounting vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • Mahayuti
  • rohit pawar
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी
1

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’
2

Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का
3

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 
4

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.