
IND VS PAK: "We are not astrologers..." Why did BCCI get angry over 'that' issue against Pakistan?
Ind-Pak handshake controversy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावर हस्तांदोलन न करण्याच्या धोरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हे हस्तांदोलन न करण्याचे धोरण दोन्ही देशांमधील प्रतिकूल भू-राजकीय परिस्थितीमुळे सुरूच राहण्याची शक्यता आहे. आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शवला होता. तेव्हापासून या वादाचा जन्म झाला आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व..
महिला एकदिवसीय विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या संघाकडून देखील पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शवला होता. त्याचप्रमाणे, भारत अ संघाच्या कर्णधाराने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना अभिवादन करण्यास नकार दिला.
हस्तांदोलन न करण्याचे धोरण सुरूच राहणार : देवजीत सैकिया
देवजीत सैकिया म्हणाले की, दोन्ही देशांमधील सध्या चांगलीच दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणताही स्पष्ट बदल अपेक्षित नाही आणि भविष्याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. त्यांनी असे सांगितले की, दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
आशिया कप ट्रॉफी वादाबद्दल देखील सैकिया यांनी उघडपणे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जिथे भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, स्पर्धेच्या शेवटी ट्रॉफी समारंभ पुढे ढकलण्यात आला आणि टीम इंडियाला अद्याप देखील ट्रॉफी हस्तांतरित करण्यात आलेली नाही.
सैकिया पुढे म्हणाले की, “आयसीसीच्या बैठकीत या मुद्द्यावर खाजगीरित्या सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच तोडगा निघणार असल्याची आशा आहे. दरम्यान, भारत क्रिकेट नियम आणि प्रोटोकॉलनुसार आपले संघ मैदानात उतरवणाऱ्य आहे. परंतु, हस्तांदोलन सारख्या संवेदनशील विषयावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही.”
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : ‘यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही…’, अजिंक्य रहाणेचा गंभीरच्या धोरणावर निशाणा
सैकिया यांनी ही देखील त्यांनी स्पष्ट केले आहे की, हा संपूर्ण मुद्दा दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांवर अवलंबून असणार आहे. सध्या यामध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेदरम्यान देखील दोन्ही देशांमधील तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. इंडिया अ संघाचा कर्णधार जितेश शर्माने देखील चालू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी कर्णधार इरफान खानशी हस्तांदोलन करण्यास टाळले.