नवी दिल्ली: आयपीएल लिलावानंतर सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅाटिच यांनी राजीनामा दिला आहे. न्यूज कॉर्पच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल लिलावात फ्रँचायझीच्या धोरणांवर तो खूश नव्हता, त्यामुळे त्याने पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
लिलावानंतर SRH संघात मोठा गोंधळ
आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी सायमन कॅाटिचचे जाणे फ्रँचायझीसाठी धोक्याचे ठरू शकते. सायमन कॅाटिचने सनरायझर्स संघावर आरोप करत आपले पद सोडले आहे. द ऑस्ट्रेलियनच्या वृत्तानुसार, मेगा लिलावापूर्वी संघ ज्या पद्धतीने चालवला जात होता आणि योजना आखल्या जात होत्या त्यावर कॅाटिच नाराज होता. त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
यानंतर कॅाटिचने हैदराबाद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर संघाच्या मालकांना ही फ्रेंचायझी नीट चालवता येत नाही का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, गेल्या वर्षभरात तीन प्रशिक्षक हैदराबाद सोडून गेले आहेत.