Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: महिलेसोबत रुममध्ये शिक्षक सापडला; संतप्त नातेवाईकांकडून कपडे उतरवून बेदम मारहाण, दोरीने बांधून…

टाकवडे (शिरोळ) येथे महिलेसोबत आढळल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाला बेदम मारहाण करून दोरीने बांधून घरात कैद केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिक्षकाची सुटका केली. प्रकरणी गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 12:31 PM
महिला उमेदवाराला शिवीगाळ, धमकी

महिला उमेदवाराला शिवीगाळ, धमकी

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षक आणि महिलेचे संबंध असल्याचा संशय
  • नातेवाईकांनी घरात घुसून शिक्षकाला पकडले
  • बेदम मारहाण करून दोरीने बांधून केले कैद
कोल्हापूर: कोल्हापूर येथून मारहाणीचा एक धक्कदायक प्रकरण समोर आला आहे. एक शिक्षक महिलेसोबत आढळून आल्याने संतप्त नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याला घरात बंदिस्त देखील केल्याचे समोर आले आहे. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथील टाकवडे (ता. शिरोळ) येथील आहे. पोलिसांनी शिक्षकाची सुटका केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नेमकं काय घडलं, प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

Pune Crime: येरवड्यात उघडपणे गांजा, दारू, वेश्या व्यवसाय, पुणे ठरतेय गुन्हेगारीचे केंद्र, पोलीस नक्की करतायत काय?

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास एक शिक्षक टाकवडे येथील एका महिलेच्या घरी आला. तेव्हा नातेवाईकांनी अचानक घरात धाड टाकली आणि शिक्षक महिलेसोबत असल्याचे पाहून संतापले. रागाच्या भरात त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याचे कपडे उतरवून दोरीने बांधून घरात कैद केले.

या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच काही वेळातच महिलेच्या घरासमोर मोठी गर्दी जमा झाली. काही नागरिकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेचे नातेवाईक ठाम राहून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता वाढताच शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त घेत घटनास्थळी धाव घेतली.

नातेवाईकांनी दिले होते इशारे

पोलिसांनी नातेवाईकांना शांत करण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्न केले. अखेरीस पोलिसांनी शिक्षकाची सुटका पोलिसांनी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेने परिसरात मोठी चर्चा रंगली. शिक्षक हा इचलकरंजीतील एका नामांकित शाळेत कार्यरत आहे. याचे काही काळापासून महिलेसोबत संबंध सुरु होते. याची कुणकुण नातेवाईकांना लागताच त्यांनी शिक्षकाला वारंवार इशारे दिले. परंतु शिक्षक काही झाल्या ऐकत नव्हता. याने नातेवाईकांमध्ये नाराजी होती. शुक्रवारी शिक्षक महिलेच्या घरी आला आणि नातेवाईकांनी धाड टाकली आणि हे सगळं प्रकरण घडलं.

पुढील कारवाई सुरु

या प्रकरणाने गावात आणि शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पुढील अनपेक्षित परिस्थिती टाळण्यासाठी घटनास्थळी बंदोबस्त कायम ठेवला आहे. पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस पुढील कारवाई करत आहे.

Pune Crime: 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन, MPSC ची करत होता तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिक्षकावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: महिलेसोबत संबंध असल्याचा नातेवाईकांना संशय होता, त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी मारहाण केली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले आणि प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

  • Que: गावात तणाव का निर्माण झाला?

    Ans: शिक्षकाला कैद करून मारहाण केल्याची माहिती पसरताच मोठी गर्दी जमली आणि परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली.

Web Title: Kolhapur crime teacher found in room with woman angry relatives strip him of his clothes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
1

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले
2

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके
3

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला
4

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.