पाटणा: बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav Guilty)यांना चारा घोटाळ्यासंदर्भातील (Fodder Scam) पाचव्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले आहे. रांचीच्या सीबीआय कोर्टाने (Ranchi CBI Court) डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटींचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे.(Lalu Prasad Yadav Guilty In Fodder Scam) कोर्टाने या प्रकरणात २४ जणांना मुक्त केले आहे. मात्र लालूंचे निकटवर्तीय नेता जगदीश शर्मा (Jagdish Sharma) आणि ध्रुव भगतला (Dhruv Bhagat) तीन-तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
[read_also content=”आधी फडणवीस आता नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन; राणे समर्थक आक्रमक https://www.navarashtra.com/latest-news/first-fadnavis-now-congress-agitation-outside-narayan-ranes-house-rane-supporters-aggressive-nrps-238678.html”]
सध्या कोर्टाने लालूंना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही. सध्या लालू यादव हे जामीनावर जेलच्या बाहेर आहेत. जर लालू यादव यांनाही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा मिळाली तर त्यांना कोर्टातून जामीन मिळू शकतो किंवा कोठडी जाहीर होऊ शकते.
या प्रकरणात एकूण १७० आरोपी होते. मात्र ट्रायल दरम्यान ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. लालू यादव यांच्यासह सगळ्या आरोपींच्या विरोधात तपास एजन्सीने २००१ मध्ये चार्जशीट दाखल केली होती. तसेच २००५ मध्ये चार्ज फ्रेमचं काम केलं आहे. झारखंडमध्ये पाच प्रकरणात लालू यादव यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. या पाचपैकी फक्त एका प्रकरणाचा निकाल बाकी होता जो आज लागला. बाकी चार प्रकरणांमध्ये कोर्टाने आधीच लालू यादव यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.