ड्रोनपासून मिसाइलपर्यंत...! भारत-इस्रायली मैत्रीचा इतिहास; PM मोदींच्या दौऱ्याने संबंधांना मिळणार अधिक बळकटी?
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता
पंतप्रधान मोदींचा अगामी दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या भेटीत इस्रायल भारतात अनेक महत्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी मिळेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyhu) यांनी या दौऱ्याचे वर्णन दोन महसत्तांची युती म्हणून केले आहे. या दौऱ्यात केवशळ शस्त्रास्त्रांची खरेदीच नव्हे, तर तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यावरही भर दिला जाणार आहे.
इस्रायल हा भारताचा दुसरा सर्वात मोठा संरक्षण पुरवठादावर आहे. भारताने आतापर्यंत इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र, हारोप आणि स्कायस्ट्रायकर लोटेरिंग दारूगोळा, क्रिस्टर मेझ २ क्षेपणास्त्रे, DRDO सोबत संयुक्तपणे विकसित केलेली Baraq-8 MRSAM प्रणाली आणि हेरॉन MK-2 UV खरेदी केली आहे.
यावेळी, भारताने रणनीतीत बदल केला आहे. भारत डिफेन्स ॲक्विझिशन प्रोसिजर (DAP) 2026 अंतर्गत इस्रायलसोबत संयुक्तपणे शस्त्र उत्पादन करणार आहे. भारताच्या अदानी डिफेन्स आणि इस्रायली एल्बिट सिस्टम्स 2016 पासून एकत्रितपणे हर्मीस ९०० ड्रोन तयार करण्याचा संयुक्त उपक्रम केला आहे. ‘हारोप’ , ‘स्काय स्ट्रायकर’ ड्रोन आता भारत-इस्रायल संयुक्तपणे बनवणार आहे.
दोन्ही देशांनी मिसाईल आणि रडार क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. दोन्ही देश संयुक्तपणे DRDO आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) विकसित केली मिसाईल आहे. ही मिसाईल भारताच्या नौदल, हवाई दल आणि लष्कराचा कणा मानली जाते.
लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी इस्रायल तंत्रज्ञानावर आधारितर छोटे शस्त्रे सध्या भारताच्या लष्करात दाखली झाली आहेत. यामध्ये Negev NG-7 LMG मशीन गन्स, Tavor आणि Galil रायफल्स भारतात उत्पादित केल्या जात आहेत.
या दौऱ्यात भारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण खरेदी करु शकते. यामध्ये ‘रॅम्पेज’ मिसाईल्स एअर लोरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, आइसब्रेकर क्षेपणास्त्र आणि राफेल स्पाईस-१००० बॉम्ब संयुक्त उपक्रमांतर्गत खरेदी केली जाऊ शकतात. LCA Tejas आणि हवाई प्लॅटफॉर्मसाठी दोन्ही देशांत प्रगत इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित केली जाऊ शकते. यामुळे भारताची लष्करी क्षमता अधिक मजबूत होईल.
Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ






