अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद; संगमनेर तालुक्यातील घटना
संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत माहिती अशी की, रणखांब गावापासून काही अंतरावर एका शेतात बिबट्या बसलेल्या अवस्थेत काही जणांनी पाहिले. त्यामुळे त्यांची चांगलीच धादंल उडाली होती. मात्र, बिबट्याची काही हालचाल दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बराच वेळ झाला तरी बिबट्याची हालचाल दिसत नसल्याने काही नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.
त्यानंतर उपविभागीय वनधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनेनुसार भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे एस.एम.पारधी, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक जोजार, एस.पी.वर्पै, रामभाऊ वर्पै, रविंद्र पडवळे, बाळासाहेब फटांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना बाजूला केले. मग पिंजराही आणला.
रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्यास बेशुध्द केले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला पिंजर्यात जेरबंद करत त्यास चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.
Web Title: Leopard caught in sangamner ahmednagar nrka