• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Leopard Fear In Junnar Taluka Forest Department Pune News

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

​कांदा काढणीच्या या गडबडीत शेतकरी आणि मेंढपाळ यांचे नाते घट्ट असले, तरी बिबट्याच्या दहशतीने या नात्यात भीती निर्माण केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 04:30 PM
मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

ओतूर परिसरात बिबट्याची दहशत (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ओतूर परिसरात बिबट्याची दहशत
मेंढपाळांचा ‘जागता पहारा’ अन् मृत्यूशी झुंज
ओतूर परिसरात कांदा काढणीचा हंगाम जोमात

ओतूर/मनोहर हिंगणे:  जुन्नर तालुक्यातील ओतूर,रोहोकडी,डुंबरवाडी, आंबेगव्हान,खामुंडी,उंब्रज, उदापुर, डिंगोरे,अहिनवेवाडी धोलवड,ठिकेकरवाडी आणि आसपासच्या परिसरात सध्या कांदा काढणीच्या हंगामाला वेग आला आहे. शेतकरी आपल्या पिकाची आवराआवर करण्यात व्यस्त असतानाच, दुसरीकडे शेकडो मेंढपाळ कुटुंबं आपल्या उघड्यावरच्या संसारासह बिबट्याच्या छायेखाली जगतायेत. शेतात मुक्कामाला असलेल्या या मेंढपाळांना ऊन, वारा, पाऊस आणि दाट अंधाराची तमा न बाळगता दररोज रात्री ‘मृत्यूशी’ दोन हात करावे लागत आहेत.

​सध्या ओतूर परिसरात कांदा काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. कांदा काढल्यानंतर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक खतासाठी स्थानिक शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात ‘वाडा’ (मेंढ्यांचा तळ) बसवण्यासाठी पाचारण करतात. यामुळे मेंढपाळ सध्या गावागावांतून विखुरले असून, त्यांचे वाडे थेट शेताच्या मध्यभागी आहेत. मात्र, हेच शेत आता बिबट्यांच्या हल्ल्याचे केंद्र बनले आहे. ऊसाची शेती आणि कांद्याची काढणी यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याने, मेंढपाळांच्या जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

​जेव्हा संपूर्ण गाव शांत निद्रेत असते, तेव्हा ओतूरच्या शिवारात मेंढपाळांची खरी कसरत सुरू होते. हातामध्ये फक्त एक जुनी टॉर्च आणि संरक्षणासाठी एक काठी, एवढ्याच बळावर हे मेंढपाळ रात्रीचा पहारा देतात. बिबट्या अतिशय चपळाईने आणि शांतपणे हल्ला करतो, त्यामुळे जराही डोळा लागला तर शेकडो मेंढ्यांचा जीव धोक्यात येतो. रात्रीच्या किर्र अंधारात बिबट्याची डरकाळी ऐकू येताच या मेंढपाळांच्या काळजाचा ठोका चुकतो, पण आपल्या ‘धनाची’ (मेंढ्यांची) राखण करण्यासाठी त्यांना जीवावर उदार होऊन बाहेर थांबावे लागते.

​गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल झाले आहेत. दुपारी कडक ऊन असते, तर रात्री अचानक सुटणारा गार वारा यांमुळे उघड्यावरचा संसार विस्कळीत होतो. मेंढपाळांकडे पक्के घर नसते; चार बांबू आणि एक प्लास्टिकची ताडपत्री म्हणजे त्यांचे घर. मुले, स्त्रिया आणि वृद्ध याच ताडपत्रीखाली आश्रय घेतात. पण या प्रतिकूल परिस्थितीतही आपला उघड्यावरचा संसार टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या कष्टकऱ्यांसमोर आहे.

​ओतूर परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा बिबट्या थेट मेंढ्यांच्या जाळीत घुसण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी मेंढपाळांचे पाळलेले कुत्रे धोक्याची सूचना देतात. कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येताच मेंढपाळ आरडाओरडा करत पेटत्या मशाली किंवा टॉर्च घेऊन धावतात. “आम्हाला स्वतःच्या जीवाची भीती वाटत नाही, पण आमच्या मेंढ्या हेच आमचे सर्वस्व आहे. त्या गेल्या तर आम्ही जगायचं कसं?” असा आर्त सवाल एका मेंढपाळाने उपस्थित केला आहे. ​वनविभागाकडून या भागात गस्त घातली जात असल्याचे दावे केले जातात, परंतु प्रत्यक्षात शेतात मुक्कामाला असलेल्या मेंढपाळांना कोणतीही सुरक्षा मिळत नाही.

‘बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवायला गेले अन् थेट…’; राजापूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मेंढपाळ बांधवांनी खालील प्रमुख मागण्या केल्या 
​सौर कंदील: वाड्याच्या चारही कोपऱ्यांवर लावण्यासाठी वनविभागाने सौर कंदील उपलब्ध करून द्यावेत.
​तातडीची मदत: बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झाल्यास पंचनाम्याचा ससेमिरा टाळून त्वरित भरपाई मिळावी.
​रात्रीची गस्त: ओतूर परिसरातील ज्या शेतात मेंढ्यांचे वाडे आहेत, तिथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवावी.
​
​कांदा काढणीच्या या गडबडीत शेतकरी आणि मेंढपाळ यांचे नाते घट्ट असले, तरी बिबट्याच्या दहशतीने या नात्यात भीती निर्माण केली आहे. कष्टकरी मेंढपाळ समाज आजही कोणत्याही आधुनिक सोयीसुविधांशिवाय निसर्गाच्या आणि हिंस्त्र श्वापदांच्या छायेत आपला संसार रेटत आहे. ओतूर परिसरातील या ‘जागत्या पहारेकऱ्यांच्या’ समस्यांकडे शासन कधी गांभीर्याने पाहणार, हाच खरा प्रश्न आहे.

Web Title: Leopard fear in junnar taluka forest department pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Forest Department
  • junnar news
  • Leopard

ताज्या बातम्या

पुढे वाचा
5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

Feb 27, 2026 | 06:54 PM
Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Feb 27, 2026 | 06:50 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Feb 27, 2026 | 06:43 PM
RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

Feb 27, 2026 | 06:40 PM
कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

Feb 27, 2026 | 06:34 PM
Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Feb 27, 2026 | 06:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.