जतमध्ये दिवसाढवळ्या ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याचे दर्शन (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, कारखाना परिसरात काम करणाऱ्या नागरिकांना एक संशयास्पद वन्यप्राणी वावरताना दिसला. त्याची हालचाल, शरीरयष्टी आणि वेग पाहता तो बिबट्या असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. काही नागरिकांनी दूरून निरीक्षण करत ही माहिती तत्काळ वनविभागाला कळवली.
महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करत प्राथमिक तपास केला असता संबंधित प्राणी बिबट्या नसून ‘रानमांजर’ असण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, कोणतीही जोखीम टाळण्यासाठी परिसरात सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे कारखाना परिसरासह आजूबाजूच्या शेतकरी व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ आपली कामे मर्यादित ठेवली. वनविभागाने पुढील काही दिवस परिसरावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणताही संशयास्पद वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Crime News : बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या






