प्रतिकात्मक फोटो
अमरावती (Amravati). जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे करोनाची चेन ब्रेक (to break the chain of corona) करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, मागील आठवडाभरापासून काही प्रमाणत रुग्णसंख्या कमी होताना (patients has been declining) दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदीची नवीन नियमावली (new rules of lockout) जाहीर केली आहे. 1 जून 2021 पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
[read_also content=”Corona Updates/ नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ४७० रुग्ण आढळले ; मृत्यूची आकडेवारी ‘जैसे थे’ https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-470-corona-patients-found-in-nagpur-district-on-tuesday-death-statistics-as-they-were-nrat-133949.html”]
जिल्हा प्रशासनाने (the district administration) जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट उदा. इतवारा बाजार, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा, सक्करसाथ इत्यादी येथे किरकोळ विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना थेट खरेदीकरीता जाता येणार नाही. याठिकाणी दुचाकी वाहन चालकांनी वाहन हे वाहनस्थळी उभे करावे. शक्य झाल्यास सायकलचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा यांनी त्यांच्या स्तरावरून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समवेत समन्वय ठेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीचे विकेंद्रीकरण करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इतकंच नाहीतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. उपभोक्ता किंवा सामान्य नागरिकांनी आपल्या जवळच्या अतिपरिचित दुकानातून खरेदी करावी. घाऊक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट खरेदी करण्याकरीता प्रवेश नाही.
वरीलप्रमाणे निर्देशांचे महापालिका आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपालिका आदींनी पोलीस विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी संघटना यांच्या समवेत समन्वय साधून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.