पुणे : मराठा आरक्षणाची(maratha reservation) लढाई आम्ही संयमानेच लढू. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका सामंजस्याची आहे. मतभेद विसरून लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एकत्र आले आहे. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचे आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही. ही लढाई संयमानेच लढली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhaji Raje ) यांनी सोमवारी स्पष्ट केले. ते पुण्यात मराठी क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.
मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणाऱ्या संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचा इशारा सोमवारी दिला. आता पुढचे मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचे संभाजीराजेंनी जाहीर केले. याचबरोबर त्यांनी, छत्रपती शाहू महाराज आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून तर्कवितर्क लढविणाऱ्यांनाही चांगलाच टोला लगावला. चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे होत नाही. पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले त्यावेळी अनेकजण म्हणाले, महाराज मॅनेज झाले. पण ज्या दिवशी मॅनेज होईल त्या दिवशी घरी जाऊन बसेल. छत्रपती मॅनेज होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला. रोड मराठा नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पाणीपत लढाईसाठी तेथे गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखल्या जाते. अशा हरयाणास्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन, असे फलक बैठकीत लावण्यात आले. ऑलिम्पिक मधील इतर पदक विजेते खेळाडू व नीरज चोप्रा यांचा मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रात सत्कार करण्यात यावा, असा निर्णय संभाजीराजे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
[blockquote content=”कोरोना संकट आणि महापुरामुळे आम्ही थांबलो. आता नांदेडला 20 ऑगस्ट रोजी एक मूक आंदोलन करू. तेच-तेच बोलून मी सुद्धा आता थकलो आहे. मराठा आरक्षणासाठी माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे. ” pic=”” name=”- छत्रपती संभाजीराजे, खासदार”]
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]