
येत्या १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा केली जाणार होती. असेही सांगण्यात आले. तर, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटात विलीन करायची असती तर त्यांनी आधी आमच्याशी चर्चा केली असती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला.या सगळ्या घडामोडींवर दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
Beed Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले आणि चिमुकलीवर…
“अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे.” अशी टिका करण्यात आली आहे.
“अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीने दुसरा धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वाने मिळाले असे नाही. मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेने झाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.” असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शरद पवार यांनी शांतपणे याचे उत्तर दिले आहे. ‘‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे व अजित पवारांनंतर पटेल, तटकरे वगैरे लोक पक्षाची धुरा सांभाळत आहेत.’’ सुप्रिया सुळे यांनीही त्याच पद्धतीने मत व्यक्त केले. म्हणजे सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह दुसऱ्याच दिवशी मुंबईला पोहोचल्या व आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला राजभवनात जात आहोत याचा सुगावा कुटुंबाला लागू दिला नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगायचे तर ‘‘सध्या राजकारण लई वंगाळ झालं आहे’’