पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेनं (Maharashtra State Council of Examination) महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या (MAHATET Exam 2021) नोंदणीची तारीख पुढे ढकलली आहे.मिळालेल्या माहितीनुसार https://mahatet.in/ या वेबसाईटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केले नाहीत अशा उमेदवारांसाठी नोंदणीची तारीख (Maharashtra TET exam 2021 Registration) पुढे ढकलण्यात आली आहे.
[read_also content=”अग्गबाई कशी ही सासूबाई ? सून न विचारता माहेरी गेली म्हणून सासूने केला अमानुष प्रकार – बातमीने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/mother-in-law-broke-head-of-daughter-in-law-after-minor-dispute-nrsr-175925/”]
महाराष्ट्र TET साठी अर्ज करण्याची प्रक्रीया ३ ऑगस्टपासून सुरु झाली. या अगोदर अर्ज करण्याची शेवटची तारीख (MAHA TET Exam Registration Date) २५ ऑगस्ट होती.ती आता ५ सप्टेंबर करण्यात आली आहे. कोरोना महामारी आणि MPSC आणि UPSC ची परीक्षा पाहता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे.
अधिसूचनेनुसार, आता महाराष्ट्र TET परीक्षेची नोदंणी प्रक्रियेची शेवटची तारीख ५ सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज न करू शकलेले उमेदवार हे लगेच अर्ज करू शकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. परीक्षेची तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे.