मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यातच मागील पाच दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहे. पुढील किमान दोन आठवडे त्यांच्यावर उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे.
आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटियरसह इतर महत्वाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणस्थळी उपस्थित असणारे डॉ. चावरे यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना अॅम्ब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं नेण्यात येत आहे. गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे सलग चार दिवस उपोषण झाले आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी सलग 48 तास त्यांनी प्रवास केला. त्यामुळे उपोषण सहा दिवसांचं झालेलं आहे. याच उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
बीपीसह शुगर लेव्हलही झाली कमी
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. सध्या त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासली आहे. त्यामध्ये त्यांची ही पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांना अशक्तपणाही जास्त प्रमाणात आहे. यानंतर त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येत आहे. त्यानंतर किमान दोन आठवडे संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार केले जातील. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
राज्य सरकारने काढला जीआर
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असे, जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकांना पण आरक्षण मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले.