झी मराठीवरील झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको यामधील राधिकाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. एक चांगली आई, आदर्श उद्योजिका आणि पत्नी अशा भूमिकेत दिसणारी राधिका म्हणजेच अनिता दातेची रिअल लाइफ लव्ह स्टोरी मात्र काहीशी वेगळी आहे. अनिता दाते रिअल लाइफमध्ये मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका चॅलेंजमध्ये अनितानं तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आणि त्यानंतर तिची रिअल लाइफ लव्हस्टोरी समोर आली. अनिता दातेचा नवरा चिन्मय केळकर सुद्धा अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे. या दोघांचं शिक्षणही एकाच कॉलेजमध्ये झालं आहे. दिड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर अनिता आणि चिन्मय लग्नाच्या बेडीत अडकले.
[read_also content=”अजब गावाची गजब मागणी!Video ‘चला हे पण करून बघूयात’, असं म्हणत सोनूने चक्क पकडलं माकड, नेमका काय आहे प्रकार तुम्हीच वाचा! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/sonu-sood-asked-to-help-out-with-monkey-menace-in-up-actors-quirky-response-nrst-88593/”]
अनिताचा नवरा चिन्मय केळकर हा लेखक असून तो बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करतो. ललित केंद्रात असताना अनिता आणि चिन्मयची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.
चिन्मय आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण चिन्मयला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली. त्यानंतर हे दोघंही लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहायला लागले. पण जवळपास दिड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांचाही विचार बदलला आणि ते लग्नाच्या बेडीत अडकले. आता या दोघांच्या लग्नाला जवळपास ११ वर्षं झाली आहेत.
[read_also content=”तो येतोय…बॉलिवूडकरांचे धाबे दणाणले, कारण आता साऊथच्या सुपरस्टारची झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटाची तारीख जाहीर https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/vijay-devarakondas-liger-release-date-announced-nrst-88726/”]