आशिया कप २०२५ मधील श्रीलंका वि बांगलादेश सामना(फोटो-ओशल मीडिया)
Sri Lanka vs Bangladesh : आशिया कप २०२५ मधील पाचवा सामना आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येत आहे. श्रीलंका स्पर्धेत पहिला तर बांगलादेश आपला दूसरा सामना खेळत आहे. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावून १३९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला जिंकण्यासाठी धावा १४० कराव्या लागणार आहे. बांगलादेशकडून शमीम हुसेनने सर्वाधिक ४२ धावा केल्या तर. श्रीलंकेकडून फिरकीपटू वानिंदु हसरांगाने फायदेशीर गोलंदाजी करत सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : Hong Kong Open Super 500 मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक!
बांगलादेशचा डाव
सामान्यापूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेश संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले होते. कर्णधार चारिथ असलंकाने घेतलेला प्रथम गोलंदाजीकहा निर्णय श्रीलंकन गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या बांगलादेश संघाची सुरवात खूपच खराब झाली. बांगलादेशने स्कोअर बोर्डवर शून्य धावा असताना पहिल्या ३ ओव्हरमध्ये आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते. नुवान तुषाराने पहिल्या ओव्हरमध्ये तनजीद हसनला शून्यावर क्लीन बोल्ड केले. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुशमंथा चमिराने परवेझ हुसैन इमॉनला विकेटकिपरकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर श्रीलंकन गोलदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर चांगलाच अंकुश ठेवला. तौहीद हृदोय ८, महेदी हसन ९ हे फलंदाज झटपट बाद झाल्यावर बांगलादेशाचा कर्णधार लिटन दासने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर शमीम हुसेन( नाबाद ४२) आणि जाकेर अली(नाबाद ४१) यांनी शानदार(६५ चेंडू ८६ धावा)भागीदारी करत बांगलादेशला सामन्यात जीवंत ठेवले. श्रीलंकेकडून वानिंदु हसरांगाने सर्वाधिक २, नुवान तुषारा १, दुशमंथा चमिरा १ विकेट घेतल्या.
बांगलादेश संघ या स्पर्धेत आपला दूसरा सामना खेळत आहे. याआधी बांगलादेशने हाँगकाँगवर ७ विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरवात केली होती. आता मात्र टार्गेट कमी दिल्यामुळे बांगलादेश गोलंदाजांसमोर लक्ष्याचा बचाव करण्याचे आव्हान असणार आहे. तर चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा हा पाहिलचा सामना असल्याने बांगलादेशने दिलेले टार्गेट पूर्ण करून स्पर्धेचा विजयी नारळ फोडण्यासाठी श्रीलंका प्रयत्नशील असणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : तो शाहिद आफ्रिदी, विष ओकणारच! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘हा’ Video पाहून तुमचे रक्त खवळेल
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकीफ,
श्रीलंका संघ खालीलप्रमाणे
श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामडू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदु हसरांगा, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, दुशमंथा चमिरा, कमिंदू मेंडिस