Kia India कडून प्री-जीएसटी बचतींसह मोठ्या फेस्टिव्ह बेनिफिट्सची घोषणा
देशातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या ऑटोमोबाइल कंपन्यांपैकी एक किया इंडियाने आज ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने प्री-जीएसटी बचतींसोबतच विशेष उत्सवी फायद्यांचा मेगा पॅकेज सादर केला असून, यातून ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर एकूण तब्बल ₹१.७५ लाखांपर्यंत बचत मिळणार आहे. हा मर्यादित कालावधीचा उपक्रम २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वैध असेल.
कंपनीच्या या विशेष ऑफरचा उद्देश सणासुदीच्या खरेदीच्या हंगामात ग्राहकांचा आनंद दुप्पट करणे हा आहे. आकर्षक सवलतींसोबत प्री-जीएसटी दरकपातीचे फायदे मिळाल्यामुळे किया वाहन खरेदी करणे या काळात अधिक फायद्याचे ठरणार आहे.
Tata Motors कडून ‘या’ वाहनांवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बोनान्झाची घोषणा
या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना कियाच्या लोकप्रिय पोर्टफोलिओमधील निवडक मॉडेल्सवर मोठ्या बचतींचा लाभ घेता येणार आहे:
या बचतींमध्ये जवळपास ₹५८,००० प्री-जीएसटी फायदे आणि जवळपास ₹१.१७ लाखांपर्यंत उत्सवी ऑफर्स यांचा समावेश आहे.
या ऑफरमुळे ग्राहकांना केवळ मोठी आर्थिक बचतच होत नाही, तर प्रगत डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वसनीय परफॉर्मन्ससह किया वाहनांचा मालकीहक्क अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळते. सणासुदीच्या हंगामात वाहन खरेदी करण्याचा उत्साह भारतीय ग्राहकांमध्ये परंपरेने असतो, आणि अशा आकर्षक ऑफरमुळे कुटुंबांसाठी स्वप्नातील कार खरेदी करणे आणखी सोपे होते.
गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
किया इंडियाने गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण डिझाइन, तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्रित सर्व्हिस क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने नवीन मापदंड निर्माण करत असून, या प्रकारच्या उपक्रमांमधून ग्राहकांचा विश्वास दृढ करण्यासोबतच अधिक पारदर्शक आणि लाभदायी मालकीहक्काचा अनुभव देण्याची वचनबद्धताही अधोरेखित होते.