Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी

नागपूरमध्ये सुनेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेवर जादूटोणा केल्याचा संशय घेणाऱ्या ७० वर्षीय सासऱ्याने तिची कुऱ्हाडीने हत्या केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 10:56 AM
Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी

Follow Us
Follow Us:
  • पिवळी नदी परिसरात ४० वर्षीय लक्ष्मी पाली यांची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली.
  • मुलाच्या मृत्यूसाठी सून जबाबदार असल्याचा सासऱ्याला संशय होता.
  • हत्येनंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदीकिनारी असलेल्या पाहुणे लेआउटमध्ये एका सासऱ्याने सुनेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांना संशय होता की, त्यांची सून जादूटोणा करते. यावरुन कुटुंबात अनेकदा वादही झाले. अशातच सासऱ्यांनी आपल्या सुनेची हत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा ७० वर्षीय नाथूलाल पालीने आपल्या ४० वर्षीय सुनेची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. महिलेची ओळख लक्ष्मी रविशंकर पाली अशी पटली आहे. मुख्य म्हणजे सुनेची हत्या केल्यानंतर शिक्षा आणि पकडले जाण्याच्या भितीने आरोपीने स्वत:चे आयुष्य संपवून टाकले. सुनेला मारुन टाकल्यानंतर विहिरीत उडी मारुन सासऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

सूनेच्या हत्येनंतर सासऱ्याने विहिरीत मारली उडी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सासऱ्यांना आपल्या सूनेवर संशय होता की, ती जादुटोणा-तंत्रमत्र अशा गोष्टी करते. यावरुन नाराज झालेल्या सासऱ्याने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जेव्हा घरी कुणीच नव्हते तेव्हा याच संधीचा फायदा घेत आरोपी सासऱ्याने सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यावेळी सून कपडे धुवत होती. कुऱ्हाडीचा हा हल्ला इतका जोरदार होता की काही वेळातच सुनेचा जागीच मृत्यू झाला. सुनेच्या मृत्यूनंतर आरोपी सासरे नाथूलाल यांनी कथितरित्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या विहरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी काढले विहिरीबाहेर…

नथूलाल यांना विहरीत उडी मारताना पाहून आजूबाजूच्या लोकांना आरडाओरड केला आणि पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. माहिती पसरताच लोकांची गर्दी घटनेस्थळी दाखल झाली. पोलिसांनी विहरीतून नथूलाल यांना बाहेर काढलं आणि मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उपचारांसाठी पाठवल. पोलिस यावेळी आपल्यासोबत फाॅरेसिंक टीमलाही घेऊन आले होते. त्यांनी सुनेच्या मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांनी घटनास्थळावरुन सर्व पुरावे गोळा केले असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…

सुनेवर जादुटोणा करण्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसेर, आरोपी नथूलाल यांचा मुलगा रविशंकर पाल याचे २०१९ साली निधन झाले. मुलाच्या मृत्यूने वडिलांचा प्रचंड मनस्ताप झाला आणि त्यांनी आपल्या सुनेला यासाठी जबाबदार ठरवले. सुनबाई जादुटोणा करत असल्याचा संशय नथुलाल यांना होता. या संशयाच्या जोरावरच त्यांनी तिचा खून करण्याचा निश्चय केला आणि संधी मिळताच कुऱ्हाडीने वार करत सुनेचा खूनही केला.

 

 

Web Title: Nagpur father in law kills daughter in law over black magic suspicion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Attempt to Murder
  • Black magic
  • crime news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…
1

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत
2

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
3

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
4

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.