नागपूर. (Nagpur). शहरात नवीन कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रथमच 200 वर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून (the Nagpur district administration) प्राप्त कोरोना अहवालानुसार शहरात मंगळवारी 203 कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील 142, ग्रामीण भागातील 57 आणि जिल्ह्याबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
[read_also content=”मुंबई/ मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील मराठवाडा दौ-यावर ; भाजपाच्या आरक्षणविरोधी नीतीची करणार पोलखोल https://www.navarashtra.com/latest-news/congress-spokesperson-dr-sanjay-lakhe-present-the-facts-of-maratha-reservation-sanjay-lakhe-patil-on-marathwada-tour-will-pursue-bjp-anti-reservation-policy-nrat-136544.html”]
नागपूर शहरात मंगळवारी केवळ 12 कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona positive patients) मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील 06, ग्रामीण भागातील 02 आणि जिल्ह्याबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आज १०५४५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील ६८५९ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ३६८६ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या ८३३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७४ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६१९ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ३५२२ रुग्ण आणि ग्रामीण भागातील २०९७ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ०४.६० लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ८९१४ इतकी असल्याचे मंगळवारी नोंदविण्यात आले.