Gary Kirsten and Azhar Mahmood Complained PCB : शेजारील देश पाकिस्तानमध्ये क्रिकेटची स्थिती चांगली दिसत नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे संघातील दोन बड्या स्टार खेळाडूंमध्ये सुरू असलेला दुरावा. वास्तविक, पाकिस्तान संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. या काळात संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यानंतर पीसीबीने मोठी कारवाई करीत बाबरकडून पांढऱ्या चेंडू क्रिकेटचे कर्णधारपद हिसकावून घेतले आणि शाहीन आफ्रिदीला संघाचा नवा कर्णधार बनवले.
पुन्हा एकदा आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून बाबरला
मात्र, आफ्रिदीच्या नेतृत्वाखालीही पाकिस्तानच्या नवसंजीवनीमध्ये काहीही बदल झाला नाही. ICC T20 विश्वचषक 2024 ची मोठी स्पर्धा पाहता व्यवस्थापनाने पुन्हा एकदा आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून बाबरला दिले. आफ्रिदीला ही गोष्ट अजून पचनी पडलेली नाही. त्याला कर्णधारपद दाखवण्यासाठी पुरेशी संधी दिली गेली नाही, असे त्याचे मत आहे. तेव्हापासून तो बोर्डावर तसेच सहकारी खेळाडूंवर नाराज असल्याचे दिसत आहे.
थेट हेड कोच गॅरी कर्स्टन यांच्याकडूनच मोहसीन नक्वी यांच्याकडे तक्रार
आफ्रिदीच्या वृत्तीला कंटाळून संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अखेर त्याच्याबद्दल पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडे तक्रार केली. कर्स्टनने पीसीबी प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शाहीन आफ्रिदीचे खेळाडू तसेच सपोर्टिंग स्टाफशी वर्तन पूर्णपणे चुकीचे आहे.
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षकच नाही तर सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद यांचेही हेच म्हणणे आहे. त्याने पीसीबीसमोर आफ्रिदीविरोधात आपले मतही मांडले आहे. महमूद म्हणतो की आफ्रिदी सपोर्टिंग स्टाफ आणि सहकारी खेळाडूंशी थेट बोलत नाही. याशिवाय तो संघाचा कर्णधार बाबर आझमशी बोलत नसल्याच्या बातम्याही येत आहेत.