दिल्ली : जम्मू काश्मिरात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अनन्वित अत्याचार तयार करण्यात आलेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ देशातील पाच राज्यात करमुक्त झाला असला तरी या चित्रपटावरून राजकारणही तप्त झाले आहे. काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहेत. केरळ काँग्रेसने काश्मिरी पंडितांवर केलेल्या ट्विटमुळे पक्षाची कोंडी झाली तर या चित्रपटाच्या कमी रिल्स आल्यामुळे रायपूर, आग्रासह अन्य शहरांत रोषही व्यक्त करण्यात येत आहे(Politics smolders on ‘The Kashmir Files’! Gandhi family’s silence on Indiraji’s letter; Threats to theater owners).
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे एक पत्र शेअर केले असून या पत्रासोबत त्यांनी ‘प्रिय राहुल गांधी, तुमच्या आजीचे मत वेगळे होते’ असे ट्वीट केले आहे. या ट्विटवर राहुल गांधी, सोनिया गाँधी अथवा प्रियंका गांधी वढेरा यांनी मौन बाळगले आहे.
पत्रात काय?
8 जानेवारी 1981 रोजी न्यूयॉर्कमध्ये राहणारे काश्मिरी पंडित डॉ. एन. मित्रा यांना इंदिरा गांधी यांनी पत्र लिहिले होते. मित्रा यांनी काश्मिरात राहणारी त्यांची पुतणी बेपत्ता झाल्यामुळे हे पत्र लिहिले होते.
छत्तीसगडमध्ये हुकुमशाही सुरू झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार जनतेला हा चित्रपट पाहण्यापासून रोखत आहे. ते राज्याच्या थिएटर मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत धमक्याही देत आहेत.
31 वर्षांपूर्वी 19 जानेवारी 1987 रोजी काश्मिरी पंडितांना अत्याचाराचा सामना करावा लागला व त्यांना आपलीच घरे सोडून जाण्याची वेळ आली. त्यावेळी राज्यात नॅशनल कॉन्फ्रेंस व काँग्रेसचे सरकार होते. विधानसभा निवडणुकीवेळी काश्मिरी पंडितांचे हत्यासत्र सुरू झाले होते. त्यानंतर फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री होताच काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला धार चढली आणि हिंदूंचा नरसंहार घडला.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]