दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे स्टारर ‘राधे-श्याम’ (Radhe Shyam) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाली आहे. चाहत्यांना या सिनेमाची प्रतीक्षा होती. पण सिनेमा रीलीज होताच निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. चित्रपट लिक झाल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. (Radhe Shyam Leaked online)
[read_also content=”हिंदी बोलता येतं का ? असं विचारल्यावर समांथाने दिलं ‘हे’ उत्तर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://www.navarashtra.com/movies/samantha-ruth-prabhu-reply-about-her-knowledge-of-hindi-language-nrsr-253082.html”]
राधे-श्यामसाठी प्रेक्षक उत्सुक होते. या सिनेमातील गाणी देखील हिट ठरत होती. चाहत्यांचा हा सिनेमा बघण्यासाठी असलेला हा उत्साह पायरेटेड कंटेट पुरवणाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे. तमिलरॉकर्स (Tamilrockers Leaked Radhe Shyam) कडून हा सिनेमा इंटरनेटवर लीक करण्यात आला आहे. तमिलरॉकर्स हे अशाच प्रकारच्या कंटेटसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून अनेकदा चित्रपट लीक केले जातात. मेकर्सना मात्र या गोष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
प्रभास-पूजाच्या या सिनेमाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात रोमान्स आणि थ्रिल दोन्ही पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेंड ट्विटरवर देखील पाहायला मिळत आहे. अनेकांनी ट्विट करत सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघत असल्याचे म्हटले आहे.






